AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्जुन तेंडुलकरच्या सासरचे लोकांचा आहे कोट्यवधींचा व्यवसाय, वाचा यादी

लवकरच अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक हे विवाहबंधनात अडकणार आहेत. पण अर्जुनच्या सासरचे लोक आहेत कोट्यवधींच्या व्यवसायचे मालक.

अर्जुन तेंडुलकरच्या सासरचे लोकांचा आहे कोट्यवधींचा व्यवसाय, वाचा यादी
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 27, 2026 | 7:45 PM
Share

Arjun Tendulkar Wedding: ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अर्जुनचा विवाह सानिया चंडोकसोबत होणार असून या लग्नाची सध्या क्रीडा आणि उद्योगविश्वात जोरदार चर्चा सुरू आहे.

अर्जुन आणि सानिया यांच्या लग्नाचा समारंभ 3 मार्च 2026 पासून सुरू होणार आहे. मुख्य विवाहसोहळा 5 मार्च 2026 रोजी एका गुप्त ठिकाणी पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. या शाही लग्नाकडे क्रीडा आणि मनोरंजन विश्वाचे लक्ष लागले आहे.

कशी झाली ओळख?

अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांची ओळख एका कॉमन फ्रेंडमार्फत झाली होती. ओळखीतून मैत्री आणि पुढे नाते अधिक घट्ट होत गेले. आता हे नाते विवाहाच्या रूपात पुढे जात आहे.

सानिया चंडोक ही यशस्वी उद्योजिका आहे. ती Mr Paws Pet Spa & Store या पाळीव प्राण्यांच्या ग्रूमिंग आणि केअर सेवा देणाऱ्या व्यवसायाच्या संस्थापक आहे. तिने 2020 साली London School of Economics मधून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी प्राप्त केली आहे. तसेच तिच्याकडे Worldwide Veterinary Service कडून व्हेटरिनरी टेक्निशियनचा डिप्लोमाही आहे.

प्रभावशाली घई कुटुंबाशी नाते

सानिया चंडोक ही उद्योगविश्वात नावाजलेल्या घई कुटुंबाशी संबंधित आहे. तिचा कौटुंबिक व्यवसाय फूड आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राशी निगडित आहे. घई कुटुंबाचे InterContinental Marine Drive या आलिशान हॉटेलमध्ये मालकी हक्क आहे. तसेच प्रसिद्ध आइसक्रीम ब्रँड Baskin-Robbins भारतात आणण्यात तिच्या कुटुंबाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

सानिया चंडोकच्या कुटुंबाचा कोट्यवधींचा व्यवसाय

सानियाचे वडील सनी चंडोक हे मुंबईतील उद्योगपती असून ते Graviss Hospitality Ltd या कंपनीशी संबंधित राहिले आहेत.

त्यांची आई गौरिका घई या देखील याच ग्रुपच्या नेतृत्व टीमचा भाग आहेत.

सानियाचे आजोबा रवि घई हे प्रसिद्ध उद्योगपती असून Graviss Hospitality Ltd चे नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन आहेत.

सानियाचे मामा गौरव घई हे सध्या Graviss Group चे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने भारत आणि मध्य-पूर्व देशांमध्ये विस्तार केला आहे.

सानियाचा भाऊ ईशान चंडोक याचेही नाव उद्योगविश्वात घेतले जाते.

अलीकडेच कुटुंबीय व्यावसायिक मालमत्तेच्या नियंत्रणावरून काही कायदेशीर वादही समोर आले होते. ज्यामध्ये सनी चंडोक यांचाही उल्लेख झाला होता.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...