
श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिकेत पदार्पण करणाऱ्या वैष्णवी शर्माचं नशिब उघडलं आहे. कारण फिरकीपटू वैष्णवी शर्माला वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे. वैष्णवीला मुंबई इंडियन्सने जी कमलिनीच्या जागी निवडलं आहे. (Photo- PTI)

मुंबई इंडियन्सची विकेटकपीर कमलिनीला दुखापत झाली आहे. त्यामुळे ती या स्पर्धेला मुकली आहे. असं असताना तिच्या जागी मुंबई इंडियन्सने फिरकीपटू वैष्णवी शर्माची नियुक्ती केली आहे. (Photo- PTI)

वैष्णवी शर्माला मुंबई इंडियन्सने 30 लाख रुपये मानधन देत संघात घेतलं आहे. वैष्णवी शर्मा फक्त 20 वर्षांची आहे. पण सोशल मीडियावर वैष्णवी खूपच चर्चेत आहे. तिचे लाखो चाहते आहेत. (Photo- PTI)

अंडर 19 वर्ल्डकप विजयात वैष्णवी शर्माचं योगदान राहीलं आहे. वैष्णवीने 7 सामन्यात 17 विकेट घेतल्या होत्या. अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरली होती. (Photo- PTI)

वैष्णवी शर्मा मध्य प्रदेशच्या चंबलमध्ये राहणारी आहे. तिचे वडील नरेंद्र शर्मा व्यवसायाने ज्योतिष आहे. वैष्णवीने 2017 मध्ये मध्य प्रदेशच्या अंडर 16 संघातून खेळण्यास सुरुवात केली. 2022 मध्ये वैष्णवी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरली होती. (Photo- PTI)