
वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत दोन स्टार खेळाडूंवर कडक कारवाई करण्यात आली आहे. युपी वॉरियर्स दिल्ली कॅपिटल्स या सामन्यात दोन खेळाडूंनी आचारसंहितेचा भंग केला. या सामन्यात यूपी वॉरियर्सने दिल्लीवर एका धावेने विजय मिळवला होता.

यूपी वॉरियर्सच्या सोफी एक्लेस्टोन आणि किरण नवगिरे यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दोन्ही खेळाडूंना त्यांच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला.

आचारसंहितेच्या कलम 2.2 चे उल्लंघन केल्याबद्दल सोफी एक्लेस्टोन आणि किरण नवगिरे यांना दंड ठोठावण्यात आला. सोफी आणि किरण या दोघांनी कलम 2.2 अंतर्गत लेव्हल 1 चे उल्लंघन मान्य केले आहे.

कलम 2.2 नुसार त्याने सामन्यादरम्यान क्रिकेट उपकरणे किंवा कपडे, मैदानी उपकरणे यांचा गैरवापर केला आहे. त्यानुसार, आचारसंहितेच्या पहिल्या स्तरावरील भंगाबद्दल सामनाधिकाऱ्याचा निर्णय अंतिम असून कारवाई केली जाते.

यूपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 20 षटकात 8 गडी बाद 138 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्ससमोर 139 धावांचे लक्ष्य होते. पण दिल्लीचा संघ 19.5 षटकांत 137 धावांत ऑलआऊट झाला आणि यूपीने अवघ्या 1 धावेने सामना जिंकला.