
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. पहिल्या डावात 212 धावा केल्या होत्या. पण दक्षिण अफ्रिकेचा संघ 138 धावा करू शकला. यामुळे ऑस्ट्रेलियाला 74 धावांची आघाडी मिळाली. या डावात कर्णधार पॅट कमिन्सने 6 विकेट घेतल्या. यासह अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. (Photo- ICC Twitter)

पॅट कमिन्सने 18.1 षटकात 28 धावा देत 6 गडी बाद केले. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये 300 विकेट घेण्याचा मान मिळवला. कसोटी क्रिकेटमध्ये 300 विकेटचा पल्ला गाठणारा पॅट कमिन्स हा आठवा गोलंदाज आहे. (Photo- ICC Twitter)

लॉर्ड्सवर 17 वर्षानंतर कर्णधाराने 5 विकेट घेण्याचा मान मिळवला आहे. यापूर्वी शेवटचा अशी कामगिरी न्यूझीलंडच्या डेनियल विटोरीने केली होती. त्यानंतर आता पॅट कमिन्सने 6 विकेट घेत मोठी कामगिरी केली आहे. (Photo- ICC Twitter)

कसोटी कर्णधारपद भूषवताना नवव्यांदा पाच विकेट घेण्याची कामगिरी पॅट कमिन्सने केली आहे. तसेच या यादीत रिची बेनॉडसह संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा कर्णधार इम्रान खानने 12 वेळा पाच विकेट घेतल्या आहेत. (Photo- ICC Twitter)

पॅट कमिन्सने या कामगिरीनंतर सांगितलं की, 'सध्या चांगली आघाडी मिळाल्याने खूप आनंद झाला. मी मागितल्यापेक्षा खूपच जास्त आहे, कोणत्याही वेगवान गोलंदाजासाठी 300 हा एक मोठा आकडा आहे. दुखापती आणि बराच काळ खेळलो. त्यामुळे खूप आनंद झाला. जेव्हा चेंडू मऊ असतो तेव्हा फलंदाजी करणे सोपे असते पण तरीही विचित्र चेंडू निपिंग करत आहे, असे वाटते. आम्ही चांगली गोलंदाजी केली.' (Photo- PTI)