ENG vs IND : Yashasvi Jaiswal चा कारनामा, शतकासह 4 रेकॉर्ड्स, विराटच्या विक्रमाची बरोबरी

Yashasvi Jaiswal Century : यशस्वी जयस्वाल भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत (India Tour Of England 2025) शतक करणारा पहिला फलंदाज ठरला. यशस्वीने यासह विराट विक्रमाची बरोबरी केली. जाणून घ्या.

| Updated on: Jun 21, 2025 | 3:31 AM
1 / 6
टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने इंग्लंड दौऱ्याची भन्नाट सुरुवात केली. यशस्वीने इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटीत शतक ठोकलं. यशस्वीने या शतकासह इतिहास घडवला आहे. यशस्वीने या खेळीसह अनेक विक्रम केले आहेत. त्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात. (Photo Credit : Bcci X Account)

2 / 6
यशस्वीने  101 धावांची खेळी केली. यशस्वीने इंग्लंड विरुद्ध 144 बॉलमध्ये 16 फोर आणि 1 सिक्ससह शतक पूर्ण केलं. यशस्वीने सामन्यातील पहिल्या दिवशी दुसऱ्या सत्रात शतक पूर्ण केलं. यशस्वीच्या कारकीर्दीतील हे एकूण पाचवं शतक ठरलं. (Photo Credit : Bcci X Account)

3 / 6
यशस्वीने ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंड विरुद्ध शतक झळकावताच महारेकॉर्ड केला. यशस्वी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये पहिला कसोटी सामना खेळताना शतक करणारा पहिला भारतीय तर एकूण पाचवा फलंदाज ठरला आहे. (Photo Credit : Bcci X Account)

4 / 6
तसेच यशस्वी दिग्गज सैय्यद मुश्ताक अली यांच्यानंतर कसोटीत इंग्लंड विरुद्ध शतक करणारा दुसरा युवा भारतीय फलंदाज ठरला. यशस्वीने वयाच्या 23 वर्ष 174 व्या दिवशी ही कामगिरी केली. तर सैय्यद मुश्ताक अली यांनी 1936 साली 21 वर्ष 221 व्या दिवशी इंग्लंड विरुद्ध शतक केलं होतं. (Photo Credit : Bcci X Account)

5 / 6
यशस्वी इंग्लंडमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात शतक करणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. यशस्वीआधी सौरव गांगुली आणि संदीप पाटील यांनी अशी कामगिरी केली होती. (Photo Credit : Bcci X Account)

6 / 6
यशस्वीच्या कसोटी कारकीर्दीतील आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासातील हे पाचवं शतक ठरलं. यशस्वीने यासह विराट कोहली आणि शुबमन गिलच्या विक्रमाची बरोबरी केली. विराट आणि शुबमननेही डब्ल्यूटीसी स्पर्धेत प्रत्येकी 5 शतकं केली आहेत. (Photo Credit : Bcci X Account)