वयाच्या 23 व्या वर्षी अभिनेत्री बनली तीन मुलींची आई

अभिनेत्री श्रीलीलाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर चिमुकल्या पाहुणीसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे. वयाच्या 23 व्या वर्षी श्रीलीला तीन मुलींची आई बनली आहे.

| Updated on: Apr 29, 2025 | 11:15 AM
1 / 5
लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. 23 वर्षीय श्रीलीलाच्या घरात एका चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.

2 / 5
'घरात एक नवीन सदस्य सहभागी झाला आहे. या सदस्याने आमचं हृदय जिंकलंय', असं कॅप्शन देत श्रीलीलाने चिमुकल्या मुलीसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. तिने या मुलीला दत्तक घेतलंय की तिच्या कुटुंबाचीच एक सदस्य आहे, हे तिने अद्याप स्पष्ट केलं नाही.

3 / 5
सोशल मीडियावर श्रीलीलाचे हे फोटो पोस्ट होताच त्यावर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. याआधी 2022 मध्ये श्रीलीलाने दोन दिव्यांग मुलांना दत्तक घेतलं होतं. गुरू आणि शोभिता अशी त्यांची नावं आहेत.

4 / 5
एका अनाथालयाला भेट दिल्यानंतर श्रीलीलाने त्यांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता. आता वयाच्या 23 व्या वर्षी ती तिसऱ्यांदा आई बनल्याचं नेटकरी म्हणत आहेत. श्रीलीलाच्या या उदार स्वभावाचं चाहत्यांकडून खूप कौतुक होत आहे.

5 / 5
श्रीलीलाने तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्रीसोबतच ती वैद्यकीय शिक्षणसुद्धा घेत आहे. 2021 मध्ये एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण करण्याआधी तिने ‘किस’ या चित्रपटातून पदार्पण केलं. ती भरतनाट्यम डान्सरसुद्धा आहे.