
सध्या आयपीएलच्या 2025 च्या सीजनसाठी सौदी अरेबिया जेद्दा येथे मेगा ऑक्शन सुरु आहे. आज ऑक्शनचा दुसरा दिवस आहे. या लिलावात सनराजयर्स हैदराबाद टीमची मालिका काव्या मारनने आतापर्यंत 40 कोटी रुपये खर्च केले आहेत.

काव्या मारनने ऑक्शनच्या पहिल्या दिवशी आठ प्लेयर्स विकत घेण्यासाठी तब्बल 40 कोटी रुपये खर्च केले. आयपीएल ऑक्शन असूं दे किवा SRH ची मॅच काव्या मारन नेहमी चर्चेत असते.

विशेष म्हणजे रविवारी मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी काव्या मारनने 40 कोटी रुपये खर्च केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 24 तासांच्या आत तिने 971 कोटींपेक्षा जास्तची कमाई केली आहे.

खास बाब म्हणजे ही कमाई तिची कंपनी सन टीव्ही नेटवर्कची मार्केट कॅप वाढल्यामुळे झाली आहे. शेअर्समध्ये 3.32 टक्के वाढ झाली. कारोबारी सत्रा दरम्यान काव्या मारनची मीडिया कंपनी सन टीव्ही नेटवर्कचा शेअर 765.80 रुपयापर्यंत पोहोचला.

काव्या मारनची कंपनी सन टीव्ही नेटवर्कचा शेअर शुक्रवारी बाजार बंद होताना 741.15 रुपये होता. कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्यासोबतच सन टीव्हीची मार्केट कॅप 971.42 कोटी रुपयांनी वाढून 30,179 कोटी रुपये झाली आहे.