AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ: टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 12 सामने खेळणार;रोहित-विराटचाही समावेश!

India Tour Of New Zealand 2026 : टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यात एकूण 3 मालिका खेळणार असल्याचं क्रिकबझच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. जाणून घ्या मालिकांच्या संभाव्य तारखा.

IND vs NZ: टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 12 सामने खेळणार;रोहित-विराटचाही समावेश!
Virat Kohli and Rohit Sharma Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Mar 13, 2026 | 10:47 PM
Share

टीम इंडियाने 2026 या वर्षाची सुरुवात न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेने केली. उभयसंघात 11 ते 31 जानेवारी दरम्यान एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळवण्यात आली. न्यूझीलंडने टीम इंडियाला एकदिवसीय मालिकेत पराभूत करुन नववर्षाची दणक्यात सुरुवात केली. न्यूझीलंडने ही एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली. त्यानंतर सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने न्यूझीलंडचा हिशोब केला. टीम इंडियाने टी 20i मालिका जिंकत वनडे सीरिजमधील पराभवाची परतफेड केली. टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टी 20i मालिका 4-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली.

त्यानंतर भारत-न्यूझीलंड दोन्ही संघ आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्यानिमित्ताने आमनेसामने आले. न्यूझीलंड पराभूत करत टीम इंडियाने टी 20i वर्ल्ड कप उंचावला. त्यानंतर आता पुन्हा एकदा टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने येणार आहेत. क्रिकबझनुसार उभयसंघात एकूण 12 सामने खेळवण्यात येणार आहेत. या 12 पैकी काही सामन्यांमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली ही टीम इंडियाची अनुभवी जोडी खेळणार आहे. क्रिकबझच्या या रिपोर्टमध्ये काय म्हटलंय? हे जाणून घेऊयात.

2 संघ, 3 मालिका आणि 12 सामने

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वनडे, टी 20i आणि टेस्ट सीरिज खेळवण्यात येणार आहेत. उभयसंघात 5 वनडे, 5 टी 20i आणि कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. टीम इंडिया या मालिकांसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.

तसेच रिपोर्ट्सनुसार रोहित आणि विराटची क्रेझ पाहता एकदिवसीय मालिकेत 3 ऐवजी 5 सामने खेळवण्यात यावेत, यावर दोन्ही संघांचं एकमत झालं आहे. तसेच टीम इंडियाच्या न्यूझीलंडच्या दौऱ्याती सांगता 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेने होणार आहे. टेस्ट सीरिजचा थरार 22 ऑक्टोबरपासून रंगणार आहे.

रोहित-विराट 5 सामने खेळणार!

दरम्यान रोहित आणि विराट या दोघांनीही टी 20i आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. त्यामुळे हे दोघे वनडे सीरिजसाठी टीम इंडियाच्या जर्सीत केव्हा उतरणार? याची प्रतिक्षा चाहत्यांना कायम असते. टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यात एकूण 5 सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार असल्याचा दावा रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे रोहित आणि विराट न्यूझीलंड विरुद्ध 5 एकदिवसीय सामने खेळू शकतात.

Follow Us
काँग्रेसमध्ये मोठं बंड? सपकाळ यांच्या हटवणीसाठी दिल्लीत मोर्चेबांधणी
Harshwardhan Sapkal | काँग्रेसमध्ये मोठं बंड? हर्षवर्धन सपकाळ यांच्या हटवणीसाठी थेट दिल्लीत मोर्चेबांधणी
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे...
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे निंबाळकर स्पष्टच बोलले...
शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल
Nagpur | शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल; भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा!
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप नेत्याची जोरदार टीका
रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक
Sakshana Salgar | रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक, पंढरपुरात पेटला नवा राजकीय वाद!
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; चाकणकरांच्या
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; रुपाली चाकणकरांच्या जागी या नावाची चर्चा, राजकारणात मोठं घडणार?
राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
Sanjay Raut UNCUT | ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय
Uddhav Thackeray | Eknath Shinde | ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय घडणार?
तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान
Sanjay Raut | 'तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान इतकं चर्चात का? राजकारणात मोठी खळबळ
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक?
Mumbai Water Shortage | मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक पुढच्या आठवड्यापासून मोठी पाणीकपात?