
स्टार प्रवाह वाहिनीवर लोकप्रिय ‘आई कुठे काय करते’चा (Aai Kuthe Kay Karte) सर्वोत्कृष्ट मालिका या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या मालिकेतील अरुंधतीच्या (Arundhati) मध्यवर्ती भूमिकेसाठी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर (Madhurani Gokhale Prabhulkar) हिला ‘सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

तर ‘सहकुटुंब सहपरिवार’ (Sahkutumb Sahparivaar) मालिकेतील मोरे हे सर्वोत्कृष्ट कुटुंब ठरले. याशिवाय गौरी, शुभम, माऊ, जिजी अक्का यासारख्या व्यक्तिरेखांचा गौरव करण्यात आला.

‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2021’चे (Star Pravah Parivaar Awards 2021) रविवारी प्रक्षेपण झाले.

‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपा-कार्तिक ही सर्वोत्कृष्ट जोडी ठरली.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील गौरीच्या भूमिकेला सर्वोत्कृष्ट सून, तर ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील शुभमला सर्वोत्कृष्ट पती हा पुरस्कार मिळाला.

‘मुलगी झाली हो’ मालिकेतील उमा पाटील आणि माऊ या अनुक्रमे सर्वोत्कृष्ट आई-मुलगी ठरल्या.