
समोशांचा व्यवसाय करण्यासाठी सर्वप्रथम, तुम्ही योग्य जागा निवडली पाहिजे. शाळा, महाविद्यालय, बस स्थानक, कार्यालयीन परिसर किंवा बाजारपेठ अशा ठिकाणी स्टॉल उभारून तुम्ही ग्राहकांपर्यंत सहज पोहोचू शकता.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुमच्याकडे FSSAI अन्न परवाना, नगरपालिकेची मान्यता आणि मोठ्या दुकानांसाठी GST नोंदणी असणे आवश्यक आहे. आवश्यक उपकरणांमध्ये गॅस, फ्रायर किंवा मोठी कढई, काउंटर, वाट्या, प्लेट्स, नॅपकिन्स आणि स्टोरेज कंटेनर यांचा समावेश आहे.

समोसा बनवण्यासाठी पीठ, बटाटे, वाटाणे, मसाले, तेल यासारखे घटक लागतात. स्टॉल सेटअप, उपकरणे आणि कच्च्या मालासह हा व्यवसाय सुमारे 25 ते 40 हजारांमध्ये सुरू करता येतो.

एका समोशाची सरासरी किंमत 15 - 20 रुपये असते आणि जर दररोज सुमारे 200 समोसे विकले गेले तर दररोजचे उत्पन्न सुमारे 3 - 4 रुपये असू शकते. जर उपकरणे आणि इतर खर्च विचारात घेतले तर दररोजचा नफा सुमारे 2 हजार रुपयांपर्यंत असतो. थोडक्यात, मासिक नफा सुमारे 45 - 75 हजार रुपये असू शकतो.

या व्यवसायाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे समोशांना नेहमीच मागणी असते आणि रोख उत्पन्न मिळत असताना नफा वाढत राहतो. हा व्यवसात कधीच बंद पडणारा नाही.