
सध्या शेअर बाजारात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. जागतिक परिस्थिती आणि भारतातील स्थिती समजून घेऊनच शेअर बाजारात गुंतवणूक करावी, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

आता शेअर बाजाराबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. सध्याच्या चालू आठवड्यात शेअर बाजार तीन दिवस बंद राहणार आहे. या सुट्ट्या नेमक्या कशामुळे? या काळात शेअर बाजार का बंद असेल? याबद्दल आपण जाणून घेऊया.

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सलग तीन दिवस शेअर बाजार बंद राहणार आहे. येत्या ३१ मार्च २०२५ रोजी ईदनिमित्त सुट्टी आहे. त्यामुळे शेअर बाजार बंद असेल.

या दिवशी सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत कोणतेही ट्रेडिंग सत्र होणार नाही. तसेच करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज विभागात कोणतेही व्यवहार होणार नाहीत.

तसेच २९ मार्चला शनिवार आणि ३० मार्चला रविवार आहे. यामुळे शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाही. म्हणजेच या आठवड्यात बाजार शनिवार, रविवार आणि सोमवारी बंद राहणार आहे.

एनएसई आणि बीएसईने ही सुट्टी जाहीर केली आहे. शेअर बाजाराच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर एनएसई आणि बीएसईने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार यानंतर १ एप्रिल म्हणजेच मंगळवारपासून नियमित व्यवहार पुन्हा सुरू होणार आहेत.

एप्रिल महिन्यातही शनिवार आणि रविवार वगळता तीन दिवस शेअर बाजार बंद राहणार आहे. एप्रिलमध्ये दोन वेळा सलग 3 दिवस शेअर मार्केट बंद राहणार आहे.

महावीर जयंतीनिमित्त 10 एप्रिल रोजी शेअर बाजार बंद असेल. तर सोमवार 14 एप्रिलला आंबेडकर जयंतीनिमित्तही बाजारात खरेदी-विक्री होणार नाही.