रब ने बना दी जोडी… मुलीच्या लग्नात सुधीर मुनगंटीवारांचा पत्नीसह ठेका

| Updated on: Dec 04, 2019 | 11:11 AM

1 / 7
महाराष्ट्रात सत्तास्थापनेची धावपळ चालू असताना, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या घरी वेगळीच रेलचेल होती. मुंबईत   सत्तेचा शुभारंभ होत असताना, मुनगंटीवारांच्या घरी सनई चौघडे वाजत होते.

2 / 7
सुधीर मुनगंटीवार यांची कन्या शलाका मुनगंटीवार विवाहबंधनात अडकली. या लग्नात जे जे वधूपित्याने करायला हवं, ते   संपूर्ण कर्तव्य मुनगंटीवारांनी पार पाडलंच, पण मुनगंटीवारांनी स्वत:ही डान्स करुन, लग्नसोहळ्याला चार चांद लावले.

3 / 7
नागपूरच्या एम्प्रेस पॅलेसमध्ये झालेल्या या लग्न सोहळयात संगीत रजनीचं आयोजन करण्यात आलं होतं. सुधीर मुनगंटीवार   यांनी पत्नी सपना मुनगंटीवार यांच्यासह वेगवेगळ्या गाण्यांवर ताल धरला.

4 / 7
सर्व कुटुंबासाठी ही गाणी कोरिओग्राफ करण्यात आली होती. संपूर्ण कुटुंब स्टेजवर असताना, सुधीरभाऊ शोस्टॉपर ठरले.

5 / 7
 एकीकडे सत्तास्थापनेची धावपळ तर दुसरीकडे लेकीचं लग्न, अशी दुहेरी धावपळीत अडकलेल्या सुधीर मुनगंटीवारांनी   दोन्ही भूमिका चोख बजावल्या.

6 / 7
सुधीर मुनगंटीवारांचा डान्स कॅमेरात कैद झाला आणि सोशल मीडियावर वायरल झाला. त्यासोबतच सुधीरभाऊंचं कौतुकही   सर्वांकडून केलं जात आहे.

7 / 7
लेकीचं लग्न त्यामुळे कुटुंबप्रमुख या नात्याने पै पाहुण्यांचं जबाबदारीपासून सर्व कौटुंबिक जबाबदारी मुनगंटीवारांवरच होती.   या दोन्ही भूमिका मुनगंटीवारांनी पार पाडल्या.