
महावितरणचा मनमानी: सबंध जिल्ह्यामध्ये शॉर्टसर्किटमुळे ऊसाला आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत असताना असे असताना कोणतीही कार्यवाही महावितरणकडून करण्यात आलेली नाही. साध्या लोंबकळणाऱ्या विद्युत ताराही ताणून घेतल्या गेल्या नाहीत.

लोणगाव शिवारात ऊसाला आग : मध्यंतरी वडवणी तालुक्यात ऊसाला आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथील गोविंद कोळसे आणि किशन कोळसे या दोन भावांचा पाच एकर ऊस जळून खाक झाला आहे.

अतिरिक्त ऊसाचे नुकसान : सध्या मराठवाड्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न पेटला आहे. कालावधी पूर्ण होऊनही ऊसतोड झालेली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत असतानाच पुन्हा ऊसाला आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ऊसामधून अधिकचे उत्पन्न तर सोडाच पण झालेला खर्चही शेतकऱ्यांच्या पदरी पडलेला नाही.

मदतीबाबत उदासिनता : आगीच्या घटनेनंतर महावितरणचे अधिकारी कर्मचारी बांधावर य़ेतात पंचनामा करतात. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी सर्व प्रक्रिया पूर्णही करतात मात्र अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्याला मदत मिळालेली नाही. त्यामुळे महावितरण नेमके काय करते याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.