
मराठी-हिंदी चित्रपट, शॉर्ट फिल्म, वेब सिरीज यामध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणारी आणि आपल्या क्यूट अंदाजात चाहत्यांनी भुरळ पाडणारी अभिनेत्री अर्थात मिथिला पालकर सध्या नवनवीन अंदाजात चाहत्यांशी कनेक्ट होतेय. ‘कप साँग आर्टिस्ट’, लिटिल थिंग्जमधील काव्या आणि ‘गर्ल इन द सिटी’ मधील मीरा सेहगल चाहत्यांना जास्तच पसंतीस उतरली. नुकतंच ‘लिटिल थिंग्ज 3’ ची घोषणा करण्यात आली आहे.

याशिवाय मिथिलानं ‘माझी हनिमून’, ‘कट्टी बट्टी’, ‘मुरंबा’, ‘कारवा’, ‘चॉप स्टिक’, ‘त्रिभंगा’ या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली.

तर वेब विश्वात मिथिला प्रचंड सक्रिय आहे. ‘लिटिल थिंग्ज’, ‘गर्ल इन द सिटी’, ‘ऑफिशिअल चुगल्यागिरी’, ‘मसाबा मसाबा’ या वेब सिरीजमधून तिनं चाहत्यांनी मनं जिंकली आहेत.

सध्या मिथिला सोशल मिडिया क्विन म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावर मिथिलाचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे भारतातच नाही तर जगभरात मितालीचे चाहते आहेत.

तिचा हा परफेक्ट समर लूक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्हीही ट्राय करू शकता.