
चित्रपट सृष्टीतील अभिनेते आणि डायरेक्टर सुंदर सी सध्या आपला नवीन चित्रपट 'अरनमनई 4' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या दरम्यान ते अभिनेत्री आणि पत्नी खुशबू बद्दल बोलले.

सिनेमा विकटनशी बोलताना सुंदर यांना त्यांच्या आणि पत्नीच्या जुन्या फोटोबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यात त्यांनी आपल्या मुलीला उचलून घेतलं होतं.

माझ्यासाठी हा खूप भावनिक क्षण होता, असं सुंदर यांनी सांगितलं. हा खूप इमोशनल क्षण आहे. डिलीवरी नंतरचा हा फोटो आहे. खुशबू त्यावेळी शुद्धीवर आलेली.

"मी कधी कोणाला सांगितलं नाही, पण आता सांगतोय, तुम्ही खुशबुच्या डोळ्यात पाहू शकता, ती इमोशनल आहे. कारण लग्नाआधी ती आजारी होती"

"एका डॉक्टरने खुशबूला सांगितलेलं की, ती कधी प्रेग्नेंट होणार नाही. खुशबू तेव्हा खूप रडलेली. तिने मला त्यावेळी दुसऱ्या कोणाबरोबर तरी लग्न करण्याचा सल्ला दिलेला" असा खुलासा सुंदर यांनी केला.

पण मला तिच्यासोबतच लग्न करायच होतं, पदरात मुल नसंल तरी तिच्याबोरबर संसार करायचा ठरवलेलं. पण नियतीच्या मनात काही वेगळच होतं. आता आम्हाला एक नाही, दोन सुंदर मुली आहेत असं सुंदर म्हणाले.

सुंदर आणि खुशबूच्या नात्याची सुरुवात 1995 मध्ये झाली. पाच वर्ष प्रेम संबंधात राहिल्यानंतर 2000 साली दोघांनी लग्न केलं. आज या जोडप्याला दोन मुली असून हे कुटुंब आनंदात आहे.