Lalbaugcha Raja : भावी सून आणि लेकासोबत सुनेत्रा पवार लालबाग राजाच्या चरणी, सासू आणि सूनेच्या नात्यातील गोडवा कॅमेऱ्यात कैद, कुंकू..
Lalbaugcha Raja : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नुकताच भावी सून आणि मुलगा पार्थ पवार यांच्यासोबत लालबागच्या राजाला पोहोचले. यावेळीचे काही खास फोटो पुढे आली आहेत.

राज्यभरात गणेशोत्सवाचे वातावरण बघायला मिळतंय. त्यातच मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली. राजकीय नेते, बॉलिवूड कलाकारही दर्शनासाठी पोहोचत आहेत.
नुकताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मुलगा पार्थ पवार आणि होणारी सून कायनात दारा यांच्यासोबत लालबागचे दर्शन घेण्यासाठी पोहोचल्या. यावेळीची काही फोटो पुढे आली.
यावेळी पार्थ पवार आणि कायनात दारा यांनी एकत्र लालबाग राजाच्या पायावर डोके टेकत आर्शिवाद घेतला. यासोबत सासूबाई सुनेत्रा पवार सुनेला काही गोष्टी शिकवताना देखील दिसल्या.
सुनेत्रा पवार यांनी कुंकू कसे लावायचे हे कायनातला शिकवले. सासूबाई सुनेत्रा पवार यावेळी सुनेला काही गोष्टी प्रेमाने समजून सांगताना दिसले.
सुनेत्रा पवार यांच्यासोबत अनेकदा कायनात धर दिसल्या होत्या. त्यानंतर पार्थ पवार आणि कायनात धर यांचा साखरपुडा झाला. पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा साखरपुडा झाला.