Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. बारामतीजवळच्या विमान अपघातात अकाली निधन झालेल्या अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देत सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या भक्कम आधाराची, विचारांची आणि सेवाभावी वृत्तीची आठवण केली. या हृदयस्पर्शी पत्रातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

| Updated on: Jul 22, 2026 | 8:57 AM
1 / 5
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज (22 जुलै) जयंती. 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने अख्खा महाराष्ट्र हळहळहला. आज त्यांच्या अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांची पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांसोबतचे काही फोटो पोस्ट करत एक भावनिक पत्रही लिहीलं आहे.  " तुमचा वाढदिवस, आज 'जयंती' म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय. आज हे सगळं अचानक हरवून गेलंय, सगळं सगळं पोरकं झालंय यावर विश्वासच बसत नाही. आज तुमचा हा दिवस साजरा करताना काळीज पिळवटून निघतंय, डोळ्यांतील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत", असं म्हणत सुनेत्रा पवार यांनी या पत्रात लिहीलं आहे. ( All Photos : Social Media)

2 / 5

दादा... एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला. घर , कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा. पण आज तुमचा हाच दिवस 'जयंती' म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय. हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही दादा...

3 / 5

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद बनून सोबत राहिलात. तुमचा तो भक्कम आधार, कठीण प्रसंगात पाठीवर पडणारी तुमची विश्वासू थाप आणि मला दिलेली साथ...आज हे सगळं अचानक हरवून गेलंय, सगळं सगळं पोरकं झालंय यावर विश्वासच बसत नाही. काळाने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून नेईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.

4 / 5

आज तुमचा हा दिवस साजरा करताना काळीज पिळवटून निघतंय, डोळ्यांतील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत.दादा, तुम्ही भलेही आज माझ्यासोबत शारीरिकदृष्ट्या नसलात, तरी तुमचे विचार, तुमच्या आठवणी , तुमचा लोकांप्रती सेवाभाव, शिस्त आणि तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहील... असं त्यांनी लिहीलं आहे.

5 / 5

माझ्या आयुष्याच्या साथीदाराला, तुमच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण आणि आदरपूर्वक प्रणाम...! अशी भावनिक पोस्ट सुनेत्रा पवार यांनी लिहीली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us