IND vs NZ: दुसऱ्या दिवशीही टीम इंडियाची तीच चूक, Live कॉमेंट्रीत गावस्कर भडकले, त्या एकाट्याला झापलं

IND vs NZ 1st Test 2nd Day: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामना सुरु आहे. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही भारतीय संघाने तीच चूक केली यामुळे गावस्कारांचा पारा चढला.

| Updated on: Nov 20, 2026 | 7:45 AM
1 / 5
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु असून भारतीय संघाने नाणेफेक जिंकून ७० धावांवर पाच विकेट घेतल्या. आता टीम इंडियाने सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही तीच चूक केली आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु असून भारतीय संघाने नाणेफेक जिंकून ७० धावांवर पाच विकेट घेतल्या. आता टीम इंडियाने सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही तीच चूक केली आहे.

2 / 5

पहिल्या दिवशी जी चूक केली तीच पुन्हा केल्याने सुनील गावस्कर भडकले. लाईव्ह कॉमेंट्री करताना सुनील गावस्करांनी ही चूक भारतीय खेळाडूंच्या लक्षात आणून दिली.

3 / 5

दुसऱ्या दिवशाची सुरुवात टीम इंडियाने प्रसिद्ध कृष्णाने केली. पहिल्याच ओव्हरपासून प्रसिद्धने टाकलेल्या लाईनवर गावस्करांनी आक्षेप घेतले. प्रसिद्धने दिवसाच्या सुरुवातीपासूनच ऑफ स्टम्पच्या बाहेरच्या लाईनवर गोलंदाजी केली. हे चेंडू निकोल्स आणि फिलिप्सने सहज सोडले.

4 / 5

या लाईनवर बॉलिंग केल्यामुळे किवी फलंदाजांना फायदा होत होता. बॉल किती स्विंग होतोय याचा अंदाज त्यांना येत होता. दिवासाच्या सुरुवातीला तुमची लाईन बॅट्समनला बॉल खेळायला लावणारी हवी ना असं सवाल गावस्करांनी विचारला.

5 / 5

दुसऱ्या दिवसाची सुरुवातच टीम इंडियाने चुकांनी केल्यामुळे त्यांना विकेट मिळालेली नाही. शिवाय फिलिप्सने त्याचे शतक पूर्ण केले. यानंतर कुठेतरी भारतीय गोलंदाजांनी आपली चूक सुधारली आणि फिलिप्सला विकेट मिळाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us