FDA Actions News : तुकाराम मुंढेंची धडक कारवाई सुरूच! कोट्यवधींचा अन्नसाठा जप्त, 7 जणांना अटक, कारवाईने राज्यात खळबळ
तुकाराम मुंढेंची धडक कारवाई सुरूच आहे. प्रशासनाने कोट्यवधींचा अन्नसाठा जप्त केला आहे. आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईने राज्यात खळबळ उडाली आहे.

राज्यभरात अन्न व औषध प्रशासमनाकडून कारवाी सुरूच आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशान्वये भेसळयुक्त आणि अनियमिततात आढळून आल्यास परवाने निलंबनाची कारवाई करण्यात आली. राज्यभरात कारवाई करत 2.23 कोटी किंमतीचा अन्नसाठा जप्त केलाय. यावेळी 23 परवाने निलंबित करून 8 विक्रेत्यांचा बंद केल्याची माहिती आहे. या कारवाईने राज्यभरात खळबळ उडाली आहे.
अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील विविध ठिकाणी कारवाई केली आहे. भिंवडीतील अन्नपदार्थांवरील मुदत दिनांक व एमआरपी थिनरने खोडून फेरछपाई केल्याचा प्रकार उघड केलाय. मे. डीएक्सपी व्हेंचर्स इंडिया प्रा. लिमिडेटकडून 2.06 कोटी किमतीचा साठा जप्त करण्यात आलाय. राज्यात एकूण 23 निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे पुण्यात जे. एम. रोड खाऊ गल्लीत 8 विनानोंदणी विक्रेत्यांचा व्यवसाय बंद करण्यात आला. त्यांच्याकडून 2.40 लाख दंड आकारण्यात आला. तसेच 10 परवाने निलंबित करण्यात आले.
दुसरीकडे, कार्तिकी वारीनिमित्त पंढपुरात 54 आस्थापनाची तपासणी करण्यात आली. दोषी आस्थापनांचेही परवाने निलंबित करण्यात आलंय. मुंबईत 6, नागपूर विभाग 1, नाशिक विभाग 1, छत्रपती संभाजीनगर 1 इत्यादी आस्थापनांचं परवाने निलंबित करण्यात आलेत. ठाणे, रायगड, पुण्यात चहा मिक्स, तूप, जेलीपॉपचा 68,094 किंमतीचा साठा जप्त करण्यात आलाय. दरम्यान, कोकण, नाशिक विभागातही कारवाई केली आहे. विभागाने 6 आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत.
मुंबईत तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचं उल्लंघन आढळून आलं. त्यानंतर अन्न सुरक्षा व मानके नियमन 2011, 2.1.8 (3) सह अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 चे कलम 26, 31 व 32 अंतर्गत 6 आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आलंय. तसेच 6 आस्थापनांना अन्नपदार्थांची खरेदी, विक्री वा वितरण करण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंखन केल्यास विनापरवाना व्यवसायाबद्दल अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. प्रतिबंधित गुटखा, पान मसाल्याविरोधात कारवाई करण्यात आली. यावेळी 16.42 लाखांहून अधिक साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात 4 FIR दाखल करत 7 जणांना अटक करण्यात आलीये.
