
सुनील गावसकर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध पदार्पण केलं होतं. या 5 कसोटी सामन्यांमध्ये गावसकर यांनी 154.80 च्या सरासरीने 4 शतके आणि 3 अर्धशतकांसह 774 धावा केल्या होत्या. गावसकर यांचा हा विक्रम अजुनही कोणाला मोडता आलेला नाही. पदार्पणाच्या मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम गावसकरांच्या नावावर कायम आहे.

वेस्ट इंडिजचा त्यावेळचा संघ एकदम ताकदवान मानला जात होता. कारण कॅरेबियन गोलंदाजांविरूद्ध मैदानावर उभं राहणं त्यावेळी मोठी गोष्ट होती. गावसकर यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या २७ कसोटी सामन्यांमध्ये मायकेल होल्डिंग, जोएल गार्नर, अँडी रॉबर्ट्स आणि माल्कम मार्शल यांच्या विरुद्ध एक नव्हे तर 13 शतके झळकावली होतीत. विंडीजविरुद्ध एका फलंदाजाने ठोकलेली सर्वाधिक शतके आहेत.

सुनील गावसकर यांनी एकदा-दोनदा नाहीतर तीनवेळा कसोटी सामन्यातील दोन्ही डावांमध्ये शतक केलं आहे. अशा प्रकारची शतके करणारे भारताचे ते एकमेव फलंदाज आहेत. पोर्ट ऑफ स्पेन मध्ये कसोटी क्रिकेट पदार्पण मालिकमध्ये त्यांनी 124 आणि 220 त्यानंतर 1987 मध्ये पाकिस्तानविरूद्ध 111 आणि 137 त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच कोलकातामध्ये 107 आणि 182 धावा ठोकल्या होत्या.

सुनील गावसरकर यांनी कसोटीमध्ये 34 शतके केली आहेत. यामधील सामन्याच्या चौथ्या डावामध्येही त्यांनी शतक केलं आहे. चौथ्या डावामध्ये पीच खराब होतं मात्र गावसकरांनी आपली छाप पाडली. गावसरांनंतर सचिनने 3 मोहम्मद अझरुद्दीन आणि विराट कोहली यांनी 2 शतके केली आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये गावसकरांचा हा विक्रम कधी मोडला जाईल असं काही वाटत नाही. सलामीवीर म्हणून फलंदाजी करताना 186 डावांत 8,511 धावा केल्या आहेत. त्यानंंतर इंग्लंडचे ग्रॅहम गूच असून त्यांनी 7,598 धावा केल्या आहेत.