पेन्शनपासून विम्यापर्यंत…; निवृत्तीनंतर सुनीता विल्यम्स यांच्या खात्यात दरमहा किती जमा होणार?

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी नासामधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांना निवृत्तीनंतर नेमका किती पगार, पेन्शन आणि कोणत्या विशेष सरकारी सुविधा मिळणार? वाचा सविस्तर माहिती

| Updated on: Jan 22, 2026 | 9:11 PM
1 / 6
आपल्या धाडसी मोहिमांनी अंतराळ संशोधनात भारताचे नाव उज्वल करणाऱ्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी नासामधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर, एका निवृत्त अंतराळवीराला अमेरिकन सरकार आणि नासाकडून नेमके किती लाभ मिळतात, याबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

2 / 6
सुनीता विल्यम्स या नासाच्या GS-15 (General Schedule) या सर्वोच्च पे-ग्रेडमध्ये कार्यरत होत्या. हा दर्जा अमेरिकेतील वरिष्ठ संघराज्य नागरी सेवा कर्मचाऱ्यांच्या बरोबरीचा असतो.

3 / 6
सुनीता विल्यम्स यांच्या अनुभवानुसार, त्यांना दरवर्षी अंदाजे १ कोटी २६ लाख रुपये ($150,000 पेक्षा जास्त) पगार मिळत होता. नासाच्या निवृत्ती धोरणानुसार, सुनीता विल्यम्स यांना फेडरल एम्प्लॉई रिटायरमेंट सिस्टम (FERS) अंतर्गत पेन्शन दिले जाईल.

4 / 6
त्यांचे पेन्शन हे त्यांच्या सेवेची एकूण वर्षे आणि त्यांच्या उच्च पगाराच्या सरासरीवर आधारित असेल. तज्ज्ञांच्या मते, निवृत्तीनंतरही त्यांना सन्मानजनक मासिक उत्पन्न मिळत राहील.

5 / 6
केवळ पेन्शनच नाही, तर नासा आपल्या माजी अंतराळवीरांना अनेक विशेष सुविधा पुरवते. थ्रिफ्ट सेव्हिंग प्लॅन (TSP) ही भारतामधील पीएफ (PF) सारखीच एक बचत योजना आहे, ज्यामध्ये नासाकडून मोठे योगदान दिले जाते.

6 / 6
निवृत्तीनंतरही सुनीता विल्यम्स यांना प्रीमियम आरोग्य विमा आणि जीवन विमा संरक्षण मिळेल. अमेरिकन सरकारच्या सामाजिक सुरक्षा नियमांनुसार त्यांना इतर सर्व भत्ते लागू होतील. आता निवृत्तीनंतर त्या नवीन पिढीला मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.