दिल्लीत सीजेपी कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; थेट सुप्रीम कोर्टातून सरन्यायाधीशांचा आला नवा आदेश

दिल्लीच्या जंतरमंतरवर कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाआधीच दिल्ली पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे. दिल्लीच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सुप्रीम कोर्टाचेही वकील उतरले आहेत.
सुप्रीम कोर्टाच्या वकिलांकडूनही मुख्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. परंतु या वकिलांना देखील पोलिसांच्या कारवाईचा सामना करावा लागला.
सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने 10 ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टाच्या परिसरात वकिलांनी केलेल्या आंदोलनावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईवर टीका केली. यानंतर सुप्रीम कोर्ट बार असोशिएसनने या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली. तसेच वकिलांच्या सुरक्षेसाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आवाहन केले. दिल्ली पोलिसांनी सुप्रीम कोर्ट आमि दिल्ली हायकोर्टाच्या सुमारे 100 वकिलांना ताब्यात घेतलं. या वकिलांना युमना स्पोर्ट्स कॉम्पलेक्समध्ये ठेवण्यात आलं आहे.
वकिलांनी दावा केला आहे की, काही महिला वकिलांना अज्ञात कॉन्स्टेबलने धक्काबुक्की केली. त्यानंतर गुन्हेगारांसाठी वापरण्यात येणाऱ्या व्हॅनमधून घेऊन गेले, असा त्यांनी दावा केला आहे.
दिल्ली पोलिसांच्या कारवाईचं वृत्त सरन्यायाधीशापर्यंत पोहोचले. त्यानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी पोलीस अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलेल्या वकिलांना सोडण्याचे निर्देश दिले आहेत.