Rajpal Yadav Case : राजपाल यादवच्या संपत्तीची किंमत 30 कोटी, आज 1.15 कोटी भरले आणि सोमवारी भरणार..तरच टळणार जेल

Rajpal Yadav Case : राजपाल यादवच्या वकिलाने सांगितलं की, माझ्या क्लायंटला 'अता पता लापता’ नावाचा चित्रपट बनवायचा होता. हे एक जॉइंट वेंचर होंत. वकिलाचं ऐकून CJI सूर्यकांत म्हणाले की, पैसे तर 'लापता' झाले ना.

| Updated on: Oct 07, 2026 | 6:00 PM
1 / 5
चीफ जस्टिस ऑफ इंडिया (CJI) सूर्यकांत, जस्टिस जॉयमाल्या आणि जस्टिस वी मोहना यांच्या खंडपीठासमोर राजपाल यादवच्या प्रकरणाची सुनावणी झाली. वडिलोपार्जित जमीन विकणार असल्याचं राजपालने सांगितलं. ते पैस मिळाल्यानंतर तक्रारदाराला सर्व पैसे परत करु असं राजपालने सांगितलं.

चीफ जस्टिस ऑफ इंडिया (CJI) सूर्यकांत, जस्टिस जॉयमाल्या आणि जस्टिस वी मोहना यांच्या खंडपीठासमोर राजपाल यादवच्या प्रकरणाची सुनावणी झाली. वडिलोपार्जित जमीन विकणार असल्याचं राजपालने सांगितलं. ते पैस मिळाल्यानंतर तक्रारदाराला सर्व पैसे परत करु असं राजपालने सांगितलं.

2 / 5

कोर्टाने त्याचा प्रस्ताव स्वीकारला व शिक्षेपासून तात्पुरता दिलासा दिला. कोर्टात राजपाल यादवच्या वकिलाने सांगितलं की, आमच्याकडे 1.15 कोटी रुपये आहेत आणि आम्ही आमची संपत्ती विकतोय. पितृपक्षामुळे नोंदणी व्यवहार होऊ शकला नसल्याचं सांगितलं.नवरात्री सुरु होताच हा व्यवहार पूर्ण होईल.

3 / 5

‘अता पता लापता’ या चित्रपटाशी संबंधित चेक बाऊन्स प्रकरणात राजपाल यादवला सर्वोच्च न्यायालयाकडून बुधवारी मोठा दिलासा मिळाला. कोर्टाने राजपालला दोन अटींवर दिलासा दिला आहे.

4 / 5

आज कोर्ट रजिस्ट्रीमध्ये 1.15 कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट जमा करण्याचा आणि सोमवारी 12 ऑक्टोंबरला रजिस्ट्रीमध्ये 85 लाख रुपये जमा करण्याच्या शब्दावर हा दिलासा दिला आहे. त्या शिवाय न्यायालयाने काही अटी-शर्ती सुद्धा घातल्या आहेत.

5 / 5

सीजेआय सूर्यकांत यांनी विचारलं की, परतफेडीची रक्कम दोन कोटीपेक्षा जास्त आहे. त्यावर राजपालच्या वकिलाने उत्तर दिलं की, संपत्तीची एकूण किंमत 30 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे. त्याची आम्ही बँक गॅरेंटी सुद्धा द्यायला तयार आहोत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us