सुनमुख, विहीणबाईंची मिठी, आजोबा शरद पवारांसोबत रेवतीचा भावूक क्षण; सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या लग्नाचा अल्बम
शरद पवार यांची नात आणि सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे नुकतीच लग्नबंधनात अडकली. मुंबईत अत्यंत थाटामाटात हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाचे काही खास फोटो आता सुप्रिया सुळेंनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिने नुकतीच उद्योजक सारंग लखानीशी लग्नगाठ बांधली. मुंबईत शनिवारी 20 जून रोजी हा लग्नसोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला.

रेवतीच्या लग्नसोहळ्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी इन्स्टाग्रामवर या लग्नाचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंसोबत त्यांनी चार शब्दांचं कॅप्शनसुद्धा लिहिलं आहे.

'धन्य. कृतज्ञतेनं भरलेलं', अशा आशयाचं कॅप्शन त्यांनी या फोटोंना दिलं आहे. या फोटोंमधील विवाहसोहळ्यातील विविध विधींचीही झलक पहायला मिळतेय. या लग्नसोहळ्यात रेवतीने सुंदर लेहंगा परिधान केला होता. तिच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केलेल्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. रेवती आणि सारंगला वैवाहिक आयुष्यासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबईतील जियो वर्ल्ड कन्वेन्शन सेंटर याठिकाणी रेवती आणि सारंग यांचं लग्न पार पडलं. या लग्नसोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती पहायला मिळाली.

लग्नातील कानपिळीच्या विधीचा हा खास फोटो. रेवतीचा भाऊ विजय सुळेनं सारंग लखानीचा कान पिळला होता. या विधीद्वारे नवऱ्या मुलाला आठवण करून दिली जाते की, ही माझी लाडकी बहीण आहे, तिला आयुष्यभर प्रेमाने जप आणि कधीही त्रास देऊ नकोस.

रेवतीच्या सुनमुख विधीचा हा आणखी एक खास फोटो.. यामध्ये रेवती सुळे, तिच्या सासूबाई आणि पती सारंग लखानी दिसत आहेत. सुनमुख विधीत सासू एका आरशामध्ये सुनेचा चेहरा पाहते.

आजोबा शरद पवार यांना रेवती प्रेमाने मिठी मारतानाचा हा खास क्षण.. नात रेवतीच्या लग्नाला शरद पवार व्हिलचेअरवर पोहोचले होते. रेवती आणि सारंग यांना त्यांनी आशीर्वाद दिला.

सुप्रिया सुळेंनी पोस्ट केलेल्या या लग्नाच्या अल्बममधील एका फोटोमध्ये त्या विहीणबाईंना मिठी मारताना दिसत आहेत. रेवती सुळेच्या सासूबाईंच्या लग्नातील या खास लूकनेही नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

रेवती सुळेनं नागपूरचे उद्योगपती आणि राजकारणी अरुण लखानी यांचा मुलगा सारंग लखानीशी लग्न केलं आहे. या लग्नसोहळ्यातील हा आणखी एक खास क्षण..