4000 कोटींच्या ‘रामायण’साठी डोकेदुखी ठरतोय हा चित्रपट; बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई सुरू

Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर रणबीर कपूरच्या 'रामायण' या बिग बजेट चित्रपटाला हा तगडी टक्कर देतोय. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात शंभर कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

| Updated on: Nov 10, 2026 | 1:06 PM
1 / 6
दिवाळीच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर चित्रपटांची चांगलीच स्पर्धा रंगली आहे. एकीकडे अभिनेता रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाची जगभरात चर्चा सुरू असताना दुसरीकडे दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्या याच्या 'सीन' (Scene) चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे, प्रदर्शनानंतर अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने जगभरात 116 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर चित्रपटांची चांगलीच स्पर्धा रंगली आहे. एकीकडे अभिनेता रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाची जगभरात चर्चा सुरू असताना दुसरीकडे दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्या याच्या 'सीन' (Scene) चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे, प्रदर्शनानंतर अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने जगभरात 116 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.

2 / 6

त्यामुळे सध्या मनोरंजनविश्वात सूर्या आणि रणबीर यांच्या चित्रपटांच्या कमाईची तुलना सुरू झाली आहे. मोठ्या बजेटच्या 'रामायण'शी स्पर्धा करत सूर्या याच्या चित्रपटाने पहिल्याच वीकेंडला 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. सूर्या याचा 'सीन' हा चित्रपट 6 नोव्हेंबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. दिग्दर्शक जीतू माधवन यांनी या चित्रपटाची कथा लिहिण्यासोबतच दिग्दर्शनाची जबाबदारीही सांभाळली आहे.

3 / 6

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात 19.15 कोटी रुपयांची नेट कमाई केली. दुसऱ्या दिवशी ही कमाई वाढून 20.35 कोटी रुपयांवर पोहोचली. तर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी चित्रपटाने 23.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.

4 / 6

अशाप्रकारे पहिल्या तीन दिवसांत भारतातील चित्रपटाची एकूण नेट कमाई 62.75 कोटी रुपये झाली आहे. तर परदेशातील कमाईसह जगभरातील एकूण कलेक्शन 116.65 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांची मुख्य भूमिका असलेला 'रामायण' हा चित्रपट 5 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. भव्य बजेट, मोठी स्टारकास्ट आणि जबरदस्त प्रमोशनमुळे या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या.

5 / 6

'रामायण'ने पहिल्या चार दिवसांत भारतात 238.85 कोटी रुपयांची नेट कमाई केली, तर जगभरातील कमाई 500 कोटींच्या जवळ पोहोचली होती. अशा मोठ्या चित्रपटाशी स्पर्धा असतानाही 'सीन'ने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अर्थात, एकूण कमाईच्या बाबतीत 'रामायण' आघाडीवर आहे. मात्र, प्रादेशिक चित्रपट असूनही 'सीन'ने मिळवलेलं यश विशेष मानलं जात आहे.

6 / 6

'सीन' हा क्राइम, अॅक्शन आणि डार्क कॉमेडीचा मिलाफ असलेला चित्रपट आहे. यामध्ये सूर्या एका पोलीस अधिकाऱ्याची म्हणजेच इंबराजची भूमिका साकारत आहे. एका जुन्या प्रकरणाचा तपास करताना त्याच्यासमोर अनपेक्षित घटना घडतात आणि कथेला वेगळे वळण मिळते. चित्रपटात सूर्यासोबत नझरिया नाझिम आणि नस्लेन महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us