AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा धक्का? दोन्ही राष्ट्रवादींचा मिळून तिसरा गट? राज्यात मोठं काही घडणार? मंत्र्याच्या विधानाने खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणावर जोरदार चर्चा सुरू असताना, शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी एक नवा राजकीय संशय निर्माण केला आहे. त्यांच्या मते, दोन्ही गट एकत्र येण्याऐवजी त्यातून तिसरा गट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिरसाट यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीतील घडामोडींना वेगळे वळण मिळाले आहे.

पुन्हा धक्का? दोन्ही राष्ट्रवादींचा मिळून तिसरा गट? राज्यात मोठं काही घडणार? मंत्र्याच्या विधानाने खळबळ
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 10, 2026 | 1:01 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच या चर्चांना हवा दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत मोठं काही तरी घडणार असल्याचं सांगितलं जात आहे. आज तटकरे पुण्यात असून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत. यावेळी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. या सर्व चर्चा सुरू असतानाच शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या प्रतिक्रियेतून नवा ट्विस्ट दिला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याऐवजी त्यातून तिसरा गट निर्माण होतो की काय? अशी शंका शिरसाट यांनी उपस्थित केली आहे. शिरसाट यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला नवे राजकीय वळण मिळाले असून राष्ट्रवादीत काय घडतंय? अशी चर्चा निर्माण झाली आहे.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुरुवातच एकमेकांचे कपडे फाडण्यात होत असेल, तर विलिनीकरण होईल असे वाटत नाही. दोन्ही राष्ट्रवादीत अंतर्गत कुस्ती सुरू आहे. सकाळी विलिनीकरणाची चर्चा आणि दुपारी एकमेकांवर आरोप होत असल्याने अंदाज बांधणे कठी झाले आहे, असं सांगतानाच दोन्ही राष्ट्रवादीचा मिळून तिसरा गट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे, तशी शंका आहे, असं संजय शिरसाट यांनी म्हटल्याने खळबळ उडाली आहे.

तोपर्यंत समाधान नाही

यावेळी त्यांनी गोकुळच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. हा पेच पुढे वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आताच बोलणे योग्य नाही, असं शिरसाट म्हणाले. संजय राऊत यांनी गोकुळवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. काही लोकांना निर्णय मान्य नाही. राऊतांच्या सरकारमधे देखील असे काही निर्णय घेण्यात आले होते. कायदेशीर पेच जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत दोन्ही गटाचे समाधान निघणार नाही. दोन्ही बाजू न्यायालया समोर मांडल्या आहेत, असं शिरसाट म्हणाले.

आम्ही तुमच्यासोबत राहू

अमोलच्या दावणीला गोकुळ दूध संघ बांधण्याचा प्रश्नच येत नाही. गोकुळ दूध संघ महाराष्ट्रच वैभव आहे. हा 5 लाख शेतकऱ्यांचा संघ आहे. गोकुळ दूध संघ जाणार नाही. हा चुकीचा प्रचार थांबवावा, असे घडले तर आम्ही तुमच्या सोबत उभे राहू, असं त्यांनी स्पष्ट केलं.

भेटण्यात गैर नाही

राऊत आणि प्रताप सरनाईक यांच्या भेटीवरही त्यांनी भाष्य केलं. सणासुदीच्या काळात गोडवा कायम असला पाहिजे. राजकीय भांडणाला सार्वजनिक जीवनात जोडणे योग्य नाही. प्रताप सरनईक भेटले काही गैर नाही. मीही अनेक लोकांना भेटत असतो, असं ते म्हणाले.

Follow Us
गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे..
Gokul : गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे 16 सदस्यांचं संख्याबळ, अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा?
संजय राऊत यांच्या भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया...
Pratap Sarnaik On Sanjay Raut : संजय राऊत यांच्या भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान
Sanjay Raut On Shinde Sena : शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान; राऊत असं का म्हणाले?
आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले
Satej Patil : आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; प्रताप सरनाईकांनी घेतली...
Pratap Sarnaik Meets Sanjay Raut : गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली संजय राऊतांची भेट, भेटीमागचं कारण काय?
ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
Thane : ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
Manoj Jarange : भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल...
Pandharpur Vitthal Temple : पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल २ टन फुलांची आकर्षक सजावट, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
Gokul : गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?
Delhi Weather : दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?