Suryakumar Yadav: मोदी माझ्यासाठी लकी, त्यांना भेटलो अन् थेट…सूर्याने सांगितलं 45 मिनिटांच्या बैठकीत काय झालं?
Suryakumar Yadav Meet PM Modi: सूर्यकुमार यादवने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीत नेमके काय घडले हे आता त्याने उघड केले आहे.

सूर्यकुमार यादव आणि त्याच्या कुटुंबाने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
आता एका मुलाखतीत सूर्याने मोदी यांच्यासोबतच्या मुलाखतीत काय घडलं ते बोलून दाखवलं आहे. तो म्हणाला की," आमच्यामध्ये ४० ते ४५ मिनिट बोलणं झाले, मोदी माझ्यासोबत इतका वेळ घालवतील असं मला वाटलही नव्हतं."
"खरंतर मोदी यांच्यासोबतची भेट माझ्यासाठी लकी ठरली. त्यांच्या भेटीनंचतर माझ्या धावा व्हायला सुरुवात झाल्या. मला वाटलं पंतप्रधान मला फार तर पाच ते दहा मिनिटे देतील पण त्यांनी ४० ते ४५ मिनिटे माझ्याशी आणि माझ्या कुटुंबाशी संवाद साधला. " असं सूर्याने बोलून दाखवले.
सूर्यकुमार यादव सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमथध्ये मुंबईची कमान सांभाळत आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला दोन सामन्यांमध्ये सूर्याने धमाकेदार कामगिरी केली. सध्या सूर्या टीम इंडियाच्या बाहेर असला तरीही देशांर्तगत सामन्यात धुमाकुळ घालत आहे.
सूर्याचे टीम इंडियात पुनरागमन करण्यासाटी अथक प्रत्यन सुरु आहे. सुरुवातीला तर त्याला मुंबईच्या संघातही स्थान मिळाले नव्हते. पण आता तो मुंबईची कमान सांभाळत आहे.