‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम प्राजक्ताला खऱ्या आयुष्यात भेटले ‘शंभुराज’; पहा साखरपुड्याचे फोटो

'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत भूमिका साकारलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा नुकताच साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

| Updated on: Aug 08, 2025 | 9:31 AM
1 / 6
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या गाजलेल्या मालिकेत येसुबाईंची भूमिका साकारून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड घराघरात पोहोचली. आता प्राजक्ताने तिच्या आयुष्याच्या एका नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. नुकताच तिचा साखरपुडा पार पडला.

2 / 6
या साखरपुड्याचे फोटो प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. विशेष म्हणजे प्राजक्ताने ज्या व्यक्तीसोबत साखरपुडा केला आहे, त्याचंही नाव ‘शंभुराज’ असं आहे. त्यामुळे खऱ्या आयुष्यातही तिला शुंभराज भेटले आहेत, अशी प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

3 / 6
गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता तिच्या खासगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. सुरुवातीला तिने पाहुणी मंडळींसोबत बघण्याच्या कार्यक्रमाचे फोटो पोस्ट केले होते. तेव्हापासून तिचा होणारा नवरा कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते.

4 / 6
अखेर प्राजक्ताने त्यावरून पडदा उचलला आहे. शंबुराजसोबतच्या साखरपुड्याचे खास क्षण तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अत्यंत थाटामाटात हा साखरपुडा पार पडला आहे. यावेळी दोघांनी पांढऱ्या आणि लाल रंगसंगतीचे कपडे परिधान केले होते.

5 / 6
प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहते आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ‘योगायोग म्हणावं लागेल.. मालिकेत भूमिका शंभुराजांच्या पत्नीची आणि खऱ्या आयुष्यात होणाऱ्या पतीचं नावही शंभुराज आहे,’ अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे.

6 / 6
प्राजक्ताने इंजीनिअरिंगचं शिक्षण घेतलंय. परंतु अभिनयाची आवड असल्याने तिने अभिनयक्षेत्रात करिअर करायचं ठरवलं. विविध मालिकांमधून तिने आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली आहे.