
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ सध्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील ओम आणि स्वीटूमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आता जवळची वाटू लागली आहे. मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेल्या स्वीटूनं आपल्या निरागस आणि सोज्वळतेने सगळ्यांचं लक्षं आपल्याकडे वेधून घेतलं आहे. स्वीटूची भूमिका साकारत असलेल्या अभिनेत्रीचं नाव अन्विता फलटणकर आहे.

‘मशरुमच्या आकाराची मुलगी.. जिला जगाची काहीच फिकीर नव्हती… मात्र तिला एकच गोष्ट माहित होती, की तिला हाक्का नूडल्स आवडतात…’ असं कॅप्शन देत #throwbackthursday या हॅशटॅगसह अन्विताने फोटो शेअर केला आहे. जोडीलाचे #thatgirlwithchubbycheeks आणि #MiniMe असे दोन हॅशटॅग्सही तिने जोडले आहेत.

आता स्वीटूनं ओमसोबत म्हणजेच शाल्व किंजवडेकरसोबत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे.

मालिकेत स्वीटू ओमच्या आईची आवडती आहे. मात्र ऑफ स्क्रिनसुद्धा त्या दोघींमध्ये प्रचंड प्रेम आहे. स्वीटूनं हा प्रेमळ फोटो शेअर केला आहे.

काळ्या रंगाच्या साडीमध्ये स्वीटू अधिकच सुंदर दिसतेय. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत.