स्विगीचा ग्राहकांना मोठा झटका, आता फुड ऑर्डर करताच मोजावे लागणार इतके रुपये

| Updated on: Sep 03, 2025 | 10:33 PM
1 / 5
अवघ्या काही मिनिटांत घरपोच फूड डिलिव्हरी करणाऱ्या स्विगीने  युजर्सना झटका दिला आहे. आता स्विगीवरून जेवण मागवेणे चांगलेच महागणार आहे. स्विगीच्या एका निर्णयाचा फटका आता हजारो ग्राहकांना बसण्याची  शक्यता आहे.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार स्विगीने आपली प्लॅटफॉर्म फी वाढवलेली आहे. ही वाढ प्रति ऑर्डर 15 रुपये करण्यात आली आहे. ही आतापर्यंतची सर्वात जास्त  प्लॅटफॉर्म फी आहे.

3 / 5
सध्याच्या सणासुदीच्याक काळात ग्राहकांची वाढती मागणी तसेच नफा लक्षात घेऊन स्विगीने हा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन आठवड्यांत स्विगीने प्लॅटफॉर्म फी तिसऱ्यांदा वाढवलेली आहे. गेल्या महिन्याता स्वतंत्र्यदिनी स्विगीने प्लॅटफॉर्म फी 14 रुपयांपर्यंत वाढवली होती. नंतर ही फी पुन्हा 12 रुपये करण्यात आली होती.

4 / 5
सध्या सणांमुळे ऑर्डर व्हॉल्यूममध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळेच आता स्विगीने  आपला प्लॅटफॉर्म चार्ज थेट 15 रुपयांपर्यंत वाढवला आहे.

5 / 5
स्विगीच्या या निर्णयानंतर आता प्रत्येक वेळी जेवण ऑर्डर केल्यावर तब्बल 15 रुपये प्लॅटफॉर्म फी द्यावी लागेल. स्विगी, झोमॅटो अशा ऑनलाईन फुड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्सकडून अशा प्रकारची प्लॅटफॉर्म फी द्यावी लागते.