
टी20 वर्ल्ड कपच्या प्रत्येक एडिशनमध्ये फॅन्सना खूप चौकार-षटकार पहायला मिळतात. 2026 च्या एडिशनमध्ये सुद्धा असच काही पहायला मिळालं. यावेळी तर 43 सामन्यातच सर्वाधिक सिक्सचा रेकॉर्ड मोडला गेलाय. ही टुर्नामेंट इतिहासतील पहिली एडिशन बनलीय जिथे 520 पेक्षा जास्त सिक्स मारण्यात आले आहेत. (PHOTO CREDIT- PTI)

टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तुटण्याच्या मार्गावर आहेत. आतापर्यंत टुर्नामेंटमध्ये 530 सिक्स लागले आहेत. एकाच वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सिक्सचा हा रेकॉर्ड बनला आहे. अजून 13 सामने बाकी आहेत. त्यामुळे हा आकडा आणखी वाढणार आहे. 600 सिक्स सुद्धा पहायला मिळू शकतात. (PHOTO CREDIT- PTI)

2026 टी20 वर्ल्ड कपने 2024 चा रेकॉर्ड मागे टाकलाय. याआधी सर्वाधिक सिक्सचा वर्ल्ड रेकॉर्ड 2024 च्या वर्ल्ड कपमध्ये नोंदला गेलेला. 2024 टी20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 517 सिक्स बसले होते. या टूर्नामेंटच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालय की, सलग दोन एडिशनमध्ये 500 सिक्सचा आकडा पार झालाय. (PHOTO CREDIT- PTI)

टीम इंडियाचे फलंदाज शिवम दुबे आणि ईशान किशनने प्रत्येकी 11-11 सिक्स मारले आहेत. या एडिशनमध्ये संयुक्तरित्या सर्वात जास्त सिक्स आहेत. या दोघांशिवाय पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने 11 सिक्स मारले आहेत. भारत सर्वात जास्त सिक्स मारणारी टीम आहे.

टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सर्वात लांबलचक मोठा सिक्स हार्दिक पंड्याच्या बॅटमधून निघालाय. नामीबिया विरुद्ध शोल्टजच्या चेंडूवर हार्दिकने लॉन्ग-ऑफला जबरदस्त सिक्स मारलेला. 109 मीटर लांब हा सिक्स गेलेला. शिवम दुबेने 107 मीटर लांब सिक्स मारला आहे. (PHOTO CREDIT- PTI)