
अभिनेत्री तापसी पन्नूचा थप्पड हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही, मात्र समीक्षकांच्या नजरेत तापसीनं चित्रपटाद्वारे योग्य मुद्दा उपस्थित केला आणि चित्रपटाचा संदेशही देशभर पोहोचला.

आता त्या चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे, तापसीला थप्पड चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

थप्पड चित्रपटातील तिची व्यक्तिरेखा अमृता ही होती. या व्यक्तिरेखेचे आभार मानत तापसीनं पुरस्कार स्वीकारला आहे.

या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी तापसीनं खास लूक कॅरी केला होता. या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती.

सोशल मीडियावर तिनं हे फोटो शेअर केले आहेत. तिच्या चाहत्यांना सुद्धा तिचे हे फोटो प्रचंड पसंतीस उतरले आहे. सोबतच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.