‘तारक मेहता’ फेम अभिनेत्रीचा विना मेकअप लूक पाहून सर्वच थक्क, कोण आहे ही अभिनेत्री?
'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री निधी भानुशाली पांढऱ्या सूटमध्ये दिसली. तिचा विना मेकअप लूक पाहून सर्वच थक्क.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेत ‘सोनू’ची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री निधी भानुशाली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

नुकतेच पापाराझींनी निधीला स्पॉट केले. यावेळी ती पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये दिसली. त्यावर तिने गुलाबी रंगाचा लहरिया दुपट्टा घेतला होता. पांढऱ्या स्लिपर्स, मोकळे केस आणि नोजरिंग असा तिचा साधा लूक होता.

विशेष म्हणजे निधीने कोणताही मेकअप केला नव्हता. पापाराझींना तिने हसत ‘हॅलो’ही केले. निधी भानुशालीने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये सोनू भिडेची भूमिका साकारली होती.

तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली. मात्र काही काळानंतर तिने मालिकेला निरोप दिला आणि अभिनयाच्या झगमगत्या दुनियेपासून काहीशी दूर राहिली.

सोशल मीडियावर मात्र ती सक्रिय असून, तिला प्रवासाची विशेष आवड आहे. तिचे ट्रॅव्हल फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात. 2024 मध्ये ती ‘सिस्टरहुड’ या शोमध्येही झळकली होती.