‘तारक मेहता..’चे निर्माते ‘दयाबेन’च्या पाया पडू लागले, म्हणाले ‘रक्ताचं नातं नाही तर..’

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी रक्षाबंधनिमित्त निर्माते असित कुमार मोदी यांना राखी बांधण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचली. या खास क्षणांचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

| Updated on: Aug 11, 2025 | 12:19 PM
1 / 7
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारून अभिनेत्री दिशा वकानी घराघरात पोहोचली. 2017 मध्ये तिने बाळंतपणासाठी ब्रेक घेतला होता. परंतु त्यानंतर ती मालिकेत परतलीच नाही. दिशाने मालिका सोडली असली तरी निर्माते असित कुमार मोदी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या ती सतत संपर्कात असते.

2 / 7
रक्षाबंधननिमित्त दिशा तिच्या दोन्ही मुलींसोबत असित कुमार मोदी यांच्या घरी त्यांना राखी बांधायला पोहोचली होती. याचा व्हिडीओ खुद्द असित मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. दयाबेनला पाहून नेटकरीही खूप खुश झाले आहेत.

3 / 7
'काही नाती नशिब विणते, रक्ताची नाही, तर हृदयाची नाती असतात. दिशा वकानी फक्त आपली दया भाभी नाही, तर माझी बहीण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हास्य, आठवणी आणि आपलेपण यांची देवाणघेवाण करणारं हे नातं आता स्क्रीनच्या खूप पुढे गेलंय,' असं त्यांनी लिहिलंय.

4 / 7
'रक्षाबंधननिमित्त पुन्हा तोच अतूट विश्वास आणि आपलेपणा जाणवला. हे नातं नेहमी गोड आणि मजबूत राहू दे', अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

5 / 7
राखी बांधून घेतल्यानंतर असित कुमार मोदी हे दिशा वकानीच्या पाया पडू लागतात. त्यानंतर दिशासुद्धा त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेताना दिसतेय. या दोघांमधील हे खास भाऊ-बहिणीचं नातं पाहून नेटकरीही खुश झाले आहेत.

6 / 7
2017 नंतर दिशा तिच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त झाली. ती पुन्हा मालिकेत परतलीच नाही. दिशा मालिकेत परत कधी येणार, हा प्रश्न आजसुद्धा चाहत्यांकडून सतत विचारला जातो.

7 / 7
असित कुमार मोदी यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. दिशाला पुन्हा एकदा मालिकेत घेऊन येणाची विनंती चाहते निर्मात्यांकडे करत आहेत.