
13 मे रोजी अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुडा मोठ्या थाटात संपन्न झाला. साखरपुड्याआधी अनेक महिने बॉलिवूड आणि राजकीय वर्तुळात परिणीती आणि राघव यांच्या नात्याची चर्चा रंगत होती. (Photo : Instagram)

या फोटोमध्ये परिणीती आणि राघव कधी प्रेमात बुडलेले दिसत आहेत तर कधी अभिनेत्रीचे डोळे पाणावलेले आहेत. या एंगेजमेंटमध्ये दोघांचेही कुटुंब आणि त्यांचे जवळचे मित्र सहभागी झाले होते आणि या एंगेजमेंटच्या चर्चा अजूनही सुरू आहेत.

परिणीतीच्या आईने तिच्यासाठी भावूक भाषण केले. ते ऐकून परिणीतीलाही तिचे अश्रू आवरता आले नाहीत. तेव्हा राघव यांनी तिला मिठीत घेऊन समजूत काढली.

परिणीती आणि राघवच्या एंगेजमेंटनंतर दोघेही ऑक्टोबरमध्ये लग्न करणार असल्याची बातमी आहे. दोघांनीही यावर सध्या मौन पाळले असून सर्व तयारी अत्यंत गुप्त ठेवण्यात येत आहे. हे लग्नही दिल्लीतच होणार असल्याचे वृत्त आहे, ज्यामध्ये अनेक नामवंत सेलिब्रिटीज हजेरी लावणार आहेत.

आपल्या बहिणीच्या आनंदात सहभागी होण्यासाठी अभिनेत्री प्रियांका चोप्राही अमेरिकेहून आली होती.

या सोहळ्या दरम्यान परिणीती चोप्रा बरीच इमोशनल झालेली दिसत होती.