
हिवाळ्यात गरम गरम पाण्याने अंघोळ करण्यावर जवळपास सर्वांचाच भर असतो. गरम पाण्याने अंघोळ केली की, थंडीपासून थोडासा दिलासा मिळतोय, याकरिता सर्वजण गरम पाण्याने अंघोळ करतात.

सतत गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्याचा वाईट परिणाम फक्त केसांवरच नाही तर त्वचेवरही होती. ज्यामुळे त्वचा अधिक प्रमाणात कोरडी पडते आणि काही दिवसांनी खाज सुटते.

गरम पाण्याने केस धुणे अत्यंत हानिकारक आहे. ज्याचा थेट परिणाम आपल्या केसांवर होतो आणि असंख्या समस्या निर्माण होतात. यामुळे गरम पाण्याने केस धुण्याच्या अगोदर 100 वेळा विचार करा.

गरम पाण्याऐवजी तुम्ही कोमट पाणी वापरू शकता. जास्त गरम पाणी केसांच्या मुळांना नुकसान पोहोचवते. थंडीमध्ये नक्कीच थंड पाण्याने केस धुणे शक्य नाही. अशावेळी आपण कोमट पाण्याचा वापर करू शकता.

जर तुम्ही गरम पाण्याने सतत केस धुतली तर केस गळतीसोबतच अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तुमच्या डोक्यात कोंड्याचीही समस्या होऊ शकते आणि एकदा कोंडा झाला तर तो काही महिने तसाच राहतो.