
बॉलिवूड अभिनेत्री या कायमच चर्चेत असतात. त्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्याने देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतात. कधीकधी अभिनेत्री या चित्रपटातील आयटम नंबर्स इतर ठिकाणी देखील परफॉर्म करताना दिसतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. या अभिनेत्रीने गोव्यातील क्लबमध्ये डान्स परफॉर्मन्ससाठी जवळपास 6 कोटी रुपये घेतले. या अभिनेत्रीची एकूण संपत्ती किती आहे असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.

आम्ही ज्या अभिनेत्रीविषयी बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोणी नसून तमन्ना भाटीया आहे. तमन्ना भाटीने 31 डिसेंबर रोजी गोव्यातील एका क्लबमध्ये परफॉर्म केले. या क्लबमध्ये परफॉर्म करण्यासाठी तिने कोट्यवधी रुपये घेतले. तमन्नाने 6 मिनिटाच्या परफॉर्मन्ससाठी 6 कोटी घेतल्याचे म्हटले जाते.

२१ डिसेंबर १९८९ रोजी मुंबईत जन्मलेली तमन्ना भाटियाला आता ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत. अभिनय कारकीर्द सुरू करण्यापूर्वी तमन्ना संगीत व्हिडीओमध्ये दिसल्या होत्या. त्याआधीच त्यांनी अभिनय शिकायला सुरुवात केली होती. अवघ्या १३ वर्षांच्या वयात अभिनेत्रीने पृथ्वी थिएटर जॉइन केले होते. तमन्ना २००५ मध्ये संगीत व्हिडिओ ‘लफ्जों’मध्ये दिसल्या होत्या. हा संगीत व्हिडीओ गायक अभिजीत सावंतचा होता, ज्यांनी प्रसिद्ध सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल’चा पहिला सीझन जिंकला होता.

त्याच वर्षी अभिनेत्रीने हिंदी चित्रपट सृष्टीत ‘चांद सा रोशन चेहरा’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. पण चित्रपट फ्लॉप झाला, त्यानंतर तमन्ना साऊथ इंडस्ट्रीकडे वळली. २००६ मध्ये तेलुगु चित्रपट ‘श्री’द्वारे साऊथ चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. तर २००६ मध्येच अभिनेत्रीने तमिळ चित्रपट ‘केदी’मध्ये काम केले. मग मागे वळून पाहिले नाही. पहाता पहाता त्या साऊथ चित्रपट सृष्टीतल्या ओळखीच्या नाव बनल्या. तमन्नाने बाहुबली मालिकेतील चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘बाहुबली’ व्यतिरिक्त त्या बाहुबली २ मध्येसुद्धा दिसल्या. बाहुबलीमध्ये त्या मुख्य भूमिकेत होत्या, पण त्याच्या पुढच्या भागात त्यांची भूमिका खूपच छोटी होती.

तरीही १८०० कोटी कमावलेल्या ‘बाहुबली २’साठी अभिनेत्रीने निर्मात्यांकडून पाच कोटी रुपये घेतले होते. तमन्नाची आज इंडस्ट्रीतील सर्वांत श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक म्हणून गणना होते. GQ इंडियाच्या रिपोर्टनुसार तमन्नाची एकूण संपत्ती १२० कोटी रुपये आहे. ती एका चित्रपटासाठी चार ते पाच कोटी रुपये घेते.