भारतातील देवभूमीत कधी जाताय? तामिळनाडूतील 4 ठिकाण स्वर्गाहूनही सुंदर
भारतातील देवभूमी हे तामिळनाडूला बोलले जाते. या राज्यातील काही ठिकाणे हे स्वर्गाहूनही सुंदर आहे. तामिळनाडूतील शहरांविषयी जाणून घ्या

तामिळनाडू हे दक्षिणेतील राज्य आहे. देशात तामिळनाडू मंदिराची भूमी म्हणून ओळखली जाते. तामिळनाडूत मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात.
तामिळनाडूतील उटी हे हनिमूनसाठी फेमस ठिकाण आहे. या शहराला डोंगराची राणी म्हटलं जातं. 1948 साली स्थापन झालेले बॉटनिकल गार्डन आजही पर्यटकांचं आवडीचं ठिकाण आहे.
तुम्ही उटीला पोहोचल्यानंतर कुन्नूर शहरालाही भेट देऊ शकता. कुन्नूर ते ऊटीदरम्यान एक टॉय ट्रेन देखील धावते. पर्यटकांचा मोठा ओढा या ठिकाणी असतो.
कन्याकुमारी हे प्रसिद्ध शहर आहे. तीन समुद्रांचा संगम या ठिकाणी होतो. बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंद महासागर अशा तीन समुद्राचा संगम कन्याकुमारीमध्ये पाहायला मिळतो. समुद्र किनाऱ्यावरील सूर्यास्त पाहण्यासाठी पर्याटकांची एकच गर्दी होते.
महाबलीपुरम हे ऐतिहासिक शहर आहे. हे शहर पल्लव राजांची राजधानी मानली जाते. महाबलीपुरम शहर हे युनेस्कोच्या जागित वारसा यादीतही समाविष्ट आहे.