Trisha Krishnan : हो, आमच्यात दुरावा आलेला पण..नयनतारा सोबतच्या भांडणाच्या मुद्यावर तृषा कृष्णन स्पष्टच बोलली
Trisha Krishnan : तृषा कृष्णन आणि नयनतारा या दक्षिणेतल्या मोठ्या अभिनेत्री आहेत. त्यात तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्याशी नाव जोडलं जात असल्याने तृषा कृष्णन या सध्या सतत चर्चेत असतात. तृषा आणि नयनतारा या कधीकाळी चांगल्या मैत्रिणी होत्या. नंतर त्याच्यात वाद झाला अशा प्रकारच्या बातम्या, चर्चा अनेक वर्ष सुरु होत्या.

कुरुवी चित्रपटांवरुन या सर्व गोष्टींची सुरुवात झाली होती. या सर्व चर्चांवर, अफवांवर दोघींनी अनेकदा, वेळोवेळी त्यांची मैत्री आधीपेक्षा अधिक जास्त घट्ट असल्याचं सांगितलं. आमच्यात अशा प्रकारचं भांडण कधीच झालं नाही असं तृषा कृष्णनने सांगितलं.

आमच्यातील भांडणाचे हे जे काही असे सो कॉल्ड मुद्दे होते, ते मीडियाने बनवलेले. मी आणि नयनतारा अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत आहोत. काही व्यक्तीगत कारणांमुळे दुरावा आला होता. पण आम्ही कधी भांडलो नाही असं तृषा कृष्णनने स्पष्टपणे सांगितलं.

नयनतारा सुद्धा या चर्चांवर, बातम्यांवर बोलली होती. तृषा आणि माझ्यामध्ये वाद आहेत, स्पर्धा आहे, अन्य समस्या अशा गोष्टी मी सुद्धा वाचल्या. पण यात काहीच तथ्य नाही असं नयनताराने सुद्धा स्पष्ट केलं होतं.

या वर्षाच्या सुरुवातीला नयनतारा आणि तृषा कृष्णन दोघांनी पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलं की, त्या चांगल्या मैत्रिणी आहेत. जो काही दुरावा आलेला तो भूतकाळ होता. दोघींनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केली होती.

दुबईत त्या ट्रीपला गेल्या होत्या. यॉटवरचे त्यांचे फोटो होते. यॉटवर दोघी शेजारी-शेजारी बसलेल्या. मागे सूर्यास्त होत होता. दोघींनी सारख्याच रंगाचे कपडे परिधान केलेले. त्यांच्या चेहऱ्यावर एक चमक होती.