माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाशी ब्रेकअपनंतर अभिनेत्रीने घेतलं आलिशान घर, पहा सुंदर फोटो

राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आणि अभिनेता वीर पहाडियाशी ब्रेकअप केल्यानंतर तारा सुतारियाने नवीन घर खरेदी केलं आहे. या घराचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

| Updated on: Feb 24, 2026 | 12:04 PM
1 / 5
ब्रेकअपच्या वृत्तांदरम्यान अभिनेत्री तारा सुतारियाने तिच्या आयुष्याची एक नवी सुरुवात केली आहे. ताराने नुकतंच तिच्या हक्काचं घर घेतलं आहे. या सुंदर घराचे फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

2 / 5
तारा सुतारियाने स्वत:चं घर घेतलं आहे. या घराचं इंटेरिअर आणि त्याची सजावट ताराने तिच्या पसंतीने केली आहे. 'नवीन सुरुवात.. माझ्या पहिल्या घरात कधीही न संपणारं हास्य आणि प्रेम येवो. मोकळ्या हातांनी मी 2026 चं स्वागत करण्यासाठी सज्ज आहे', अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

3 / 5
चाहत्यांसोबतच इंडस्ट्रीतील काही सेलिब्रिटींनीही तारावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. रिया चक्रवर्ती, दिशा पटानी, बादशाह, सोनम बाजवा, महिमा चौधरी यांनी कमेंट्स करत ताराला शुभेच्छा दिल्या आहेत.

4 / 5
अभिनयासोबतच ताराला संगीताची फार आवड आहे. हीच आवड जपण्यासाठी तिने घरात मोठा पियानोसुद्धा ठेवला आहे. ताराने तिच्या नव्या घराला फुलांनी आणि कँडल्सने अत्यंत सुंदर पद्धतीने सजवलं आहे.

5 / 5
राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहाडियाला तारा डेट करत होती. परंतु काही दिवसांपूर्वीच या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्याआधी तारा कपूर कुटुंबातील आदर जैनला डेट करत होती.