
टीम इंडियाला आपल्या नेतृत्त्वात t-20 वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या रोहित शर्माने इतिहास रचला. भारतीय क्रिकेट चाहत्यांना आपल्या टीमला चॅम्पियन होताना पाहायचं होतं. ते स्वप्न रोहित शर्माने आपल्या कॅप्टन्सीमध्ये पूर्ण केलं.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने एकही सामना गमावला नाही. सलग आठ सामन्यांमध्ये विजय मिळवला. यामध्ये रोहितची कॅप्टन्सीसुद्धा महत्वाची ठरली.

टीम इंडियाने साऊथ आफ्रिका संघावर विजय मिळवत फायनलवर आपलं नाव कोरलं. दोन्ही टीमसाठी फायनल महत्त्वाची होती. दोन्ही टीममध्ये अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. रोहितने शेवटला गोलंदाजांचा हुशारीने वापर करत सामना आपल्या बाजूने खेचला.

वर्ल्ड कप जिंकल्यावर रोहितचे अनेक फोटो असे होते जे कायम लक्षात राहतील. यामध्ये तो मैदानावर झोपलेला, भावूक झालेला, पिचवरील माती खात असताना पण रोहितने एक खास फोटो पोस्ट केला.

रोहित शर्माने आपल्या सोशल मीडियावर बार्बाडोस येथे भारताचा तिरंगा तेथे रोवतानाचा फोटो शेअर केला आहे. रोहितच्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.