
भारताचा माजी ऑफ स्पिनर हरभजन सिंह सोशल मीडियावर असं काही तरी करतो की, त्यामुळे तो अनेकदा चर्चेत असतो. हरभजनने मंगळवारी एक्सवर विचारलं की, हा कोणाचा मुलगा आहे? (PC-INSTAGRAM)

हरभजन सिंहचा एक फोटो व्हायरल होतोय. त्यात एक मुलगा त्याच्या मांडीवर बसलेला आहे. त्याच्या हातात केक आहे. हा हरभजनचाच मुलगा असल्याचा दावा केला जातोय. हरभजनने मात्र इनकार केला आहे. (PC-INSTAGRAM)

हरभजन सिंहला एक मुलगी आणि मुलगा आहे. मुलीच नाव हिनाया आहे. मुलाचं नाव जोवान वीर सिंह आहे. हरभजनचा मुलगा जोवान चार वर्षांचा झालाय. ज्या मुलासोबत हरभजनचा फोटो व्हायरल झालाय, तो हरभजनचा मुलगा नाहीय. (PC-INSTAGRAM)

कोणीतरी आर्टिफिशल इंटेलिजेंसचा वापर करुन हरभजन आणि एका अज्ज्ञात मुलाचा फोटो व्हायरल केलाय. त्याला हरभजनचा मुलगा म्हटलय. पण खरच याचं हरभजनशी काही देणं-घेणं नाहीय. (PC-INSTAGRAM)

हरभजन सिंह त्याचा मुलगा जोवानबद्दल बोललेला की, त्याला अपेक्षा आहे की, एकदिवस त्याचा मुलगा सचिन सारखा बनेल. हरभजनची इच्छा आहे की, एकदिवस त्याच्या मुलाने सचिनसारखी 10 नंबरची जर्सी घालावी. (PC-INSTAGRAM)