
भारताच्या या विजयात महत्वाचं योगदान दिलं ते इशान किशनने. त्याने पाकिस्तानी गोलंदाजांना सळो की पळे करुन सोडलं. चौफेर फटकेबाजी करत त्याने पाकिस्तानी गोलंदाजांची लय बिघडवून टाकली. इशान किशनने वादळी खेळी करताना 40 चेंडूत 77 धावा फटकावल्या. (Matt Roberts-ICC/ICC via Getty Images)

इशान किशन जसा धावांचा पाऊस पाडतो तसाच तो संपत्ती कमावण्यातही मागे नाहीय. इशान किशनने क्रिकेटच्या माध्यमातून भरपूर माया जमवलीय. इशान किशनने कालच्या सामन्यात 10 फोर आणि 3 सिक्स मारले. महत्वाचं म्हणजे जिथे फिल्डर नाहीत, अशाच ठिकाणी त्याने फटकेबाजी केली.

इशान किशनचा जन्म पाटण्यात झाला. पण तो झारखंडकडून क्रिकेट खेळला. लेफ्टी आक्रमक फलंदाज अशी इशान किशनची ओळख आहे. इशानच्या संपत्तीबाबत बोलायचं झाल्यास त्याने IPL सह अन्य फॉर्मेटमध्ये खेळताना त्याने कोट्यवधींची संपत्ती जमा केलीय. (PTI)

क्रिक ट्रॅकरच्या रिपोर्टनुसार Ishan Kishan Networth अंदाजे 7 मिलियन डॉलर (जवळपास 63 कोटी रुपये) आहे. यात क्रिकेटमधून होणाऱ्या कमाईसह तमाम कंपन्यांकडून ब्रँड एंडोर्समेंटच्या रुपाने होणाऱ्या कमाईचा सुद्धा समावेश आहे. (PTI)

इशान किशनचा आयपीएल करिअर खूप शानदार राहिलं आहे. 2016 साली गुजरात लायन्सने त्याला पहिल्यांदा 35 लाख रुपयात विकत घेतलं होतं. IPL 2025 मध्ये सनरायझर्स हैदराबादने त्याला 11.25 कोटी रुपयात विकत घेतलं.