तू दिवाळीतील कोणत्या फटाक्यासारखी आहेस? तेजश्री प्रधानचे उत्तर ऐकून चाहतेही हैराण

अभिनेत्री तेजश्री प्रधानने दिवाळीच्या निमित्ताने स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची भन्नाट तुलना केली आहे. 'झी मराठी'वरील 'स्वानंदी'ने स्वतःला फुलबाजी आणि चिवड्यासारखे म्हटले. '

Updated on: Oct 23, 2025 | 4:40 PM
1 / 6
दिवाळीचा नुसता विचार केला तरी डोळ्यासमोर लख्ख प्रकाश, गोड फराळ आणि सेलिब्रेशनचा उत्साह येतो. दिवाळी ही प्रत्येकासाठी खास असते आणि कलाकारही त्यासाठी अपवाद नाहीत.

2 / 6
'झी मराठी'वरील लोकप्रिय मालिका 'वीण दोघातली ही तुटेना' मधील 'स्वानंदी' म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधानने दिवाळीच्या निमित्ताने स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची भन्नाट तुलना केली आहे. नुकतंच तेजश्रीला 'तू दिवाळीतील कोणत्या फटाक्यासारखी आहेस?' असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तिचं उत्तर ऐकून चाहतेही हसू लागले.

3 / 6
मला वाटतं मी फुलबाजीसारखी आहे. फुलबाजी 'तड तड' करत प्रकाश देते, पण त्याच वेळी एक शांत आणि हळूवार अनुभवही देते. ती हळूहळू मंद होत जाते आणि त्यात एक सौंदर्य आहे. असे तेजश्रीने म्हटले.

4 / 6
यानंतर तिला तू फराळातील कोणता पदार्थ आहेस, याबद्दल विचारण्यात आले. त्यावर तेजश्रीने स्वतःला चक्क चिवडा म्हटले. माझ्या मते, मी चिवड्यासारखी आहे.

5 / 6
चिवडा हा बाकीच्या पदार्थांपेक्षा तो थोडा हेल्दी असतो आणि त्यात कितीतरी गोष्टींचं मिश्रण असतं. त्याचप्रमाणे, मी सुद्धा अनेक विषयांवर बोलते आणि लोकांच्या मनाला आधार देण्याचा प्रयत्न करते., असे तेजश्री म्हणाली.

6 / 6
मी नेहमीप्रमाणेच यावर्षीही माझ्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत दिवाळी साजरी करणार आहे. मी दरवर्षी घरासमोर खूप सारे दिवे लावून सगळीकडे प्रकाश आणि आनंद पसरवत दिवाळी साजरी करते. यंदाही तशीच करणार आहे, असेही तेजश्रीने सांगितले.