
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. विशेष म्हणजे तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे दोघेही आज कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत.

करण कुंद्रा याने काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये 20 कोटींचे एक आलिशान घर खरेदी केली. फक्त हेच नाही तर अत्यंत महागड्या गाड्यांचे कलेक्शन करणकडे आहे.

दुसरीकडे तेजस्वी प्रकाश ही देखील कोट्यवधी संपत्तीची मालकीन असून काही दिवसांपूर्वीच तेजस्वी प्रकाश हिने दुबईमध्ये एक आलिशान घर खरेदी केले.

तेजस्वी प्रकाश हिचे फक्त विदेशातच नाही तर मुंबईमध्ये देखील अनेक ठिकाणी आलिशान घरे आहेत. काही दिवसांपूर्वीच तिने गोव्याला घर खरेदी केले.

तेजस्वी प्रकाश हिच्याकडे देखील आलिशान गाड्यांचे मोठे कलेक्शन हे बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच तिने 90 लाखांची अत्यंत आलिशान गाडी खरेदी केली.