
तेलुगू स्टार प्रभासची फॅन फॉलोइंग सगळ्या जगात आहे. प्रभास एक ग्लोबल स्टार आहे आणि बाहुबली स्टारने हे सिद्ध केलय की तो किती मोठा कमालीचा अभिनेता आहे.आज प्रभासचा वाढदिवस आहे. प्रभासचं संपूर्ण नाव सूर्यनारायण वैंकट प्रभास राजु उप्पलपाटि आहे. त्याचा जन्म23 ऑक्टोंबर 1979 ला आंध्र प्रदेशात झाला.

प्रभासने आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक सरस चित्रपट दिले. प्रभास एक सुपरस्टार आहे. पण त्याच्या करिअरमधील काही चित्रपट फ्लॉप सुद्धा झाले. आज त्याच्या करिअरमधील फ्लॉप झालेल्या मोठ्या चित्रपटांबद्दल जाणून घ्या. मेकर्सचे सगळे पैसे वाया गेले.

ईश्वर हा तेलुगु भाषेतील प्रभासचा पहिला एक्शन ड्रामा चित्रपट होता. हा चित्रपट फ्लॉप झाला. जयंत सी परंजी यांनी हा चित्रपट डायरेक्ट केलेला. चित्रपटात प्रभास आणि श्रीदेवी विजयकुमार यांनी काम केलेलं.

प्रभासची फिल्म राघवेंद्र सुद्धा फ्लॉप ठरली. 'राघवेंद्र'च बजेट जवळपास 3 कोटी रुपये होतं. या चित्रपटाने जवळपास 2 कोटी रुपयांच कलेक्शन केलं. 'अदावी रामुडु' ने बॉक्स ऑफिसवर जवळपास 10.90 कोटी रुपयांची कमाई केली होती. या फिल्ममध्ये प्रभाससोबत आरती अग्रवाल होती.

पूजा हेगडसोबत आलेल्या राधे श्याम (2022) या प्रभासच्या फिल्मच बजेट 350 कोटी होतं. 'राधे श्याम'ने जगभरात 205 ते 215 कोटींची कमाई केली.