Weather Update : दुपारी घराबाहेर पडणे टाळाच, हवामान विभागाचा मोठा इशारा, 12 ते 4..

Weather Update : राज्यात उष्णता वाढताना दिसत आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा अलर्ट जारी केला. राज्यात उष्णता वाढण्याचे संकेत असतानात वारं फिरल्याचे बघायला मिळतंय.

| Updated on: Oct 14, 2026 | 7:44 AM
1 / 5
राज्यातून मॉन्सून परतल्यानंतर उष्णता वाढत आहे. उकाड्यात मोठी वाढ झाल्याने शरीराची लाहीलाही होत आहे. मात्र, काही हवामान तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसात राज्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. वारं फिरू शकते.

राज्यातून मॉन्सून परतल्यानंतर उष्णता वाढत आहे. उकाड्यात मोठी वाढ झाल्याने शरीराची लाहीलाही होत आहे. मात्र, काही हवामान तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसात राज्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. वारं फिरू शकते.

2 / 5

त्यात आज 14 ऑक्टोबर रोजी भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, रायगड आणि रत्नागिरीमध्ये उष्णतेचा इशारा दिला.

3 / 5

पुणे, सातारा, बीड, जालना, रायगड या जिल्ह्यात भारतीय हवामान विभागाने उष्णता वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला. यासोबतच काही ठिकाणी पावसाचीही शक्यता वर्तवली आहे.

4 / 5

पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा या भागात पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे. ज्यामुळे उन्हाच्या चटक्यामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. 12 ते 4 आज उष्णता अधिक असेल. 

5 / 5

एल निनोमुळे राज्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. पावसाने पाठ फिरवली. त्यातच ऑक्टोबर महिन्यात उष्णता वाढताना दिसत आहे. ऑक्टोबर हीट राज्यात बघायला मिळतंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us