Maharashra Weather : राज्यातील हवामानात मोठा बदल, हुडहुडी वाढली, पुढील 24 तासात..
Maharashra Weather : राज्यातील हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात पुढील काही तासात कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

राज्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. तापमानात मोठी घसरण नोंदवण्यात आली. चक्रीवादळाचा परिणाम राज्यातील हवामानावर होण्याची शक्यता होती. पण अचानक चक्रीवादळाची दिशा बदलण्याने फार काही परिणाम झाला नाही.
दोन दिवस थंडी कमी झाली. आता पुन्हा तापमानात घट झाली. धुळ्यात नीचांकी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात 6.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. राज्यातील किमान तापमानात घट होत आहे.
बंगालच्या उपसागरात अक्कान चक्रीवादळ धडकले असून काही राज्यात स्थिती गंभीर आहे. थंड हवा येऊ लागल्याने राज्यात गारठा वाढला आला. किमान तापमान घसरले आहे. पुढील 24 तासात तापमान अजून खाली जाण्याची शक्यता आहे.
नाशिक, यवतमाळ, परभणी, पुणे आणि जेऊरमध्ये मागच्या काही दिवसांचा विचार केला असता तापमानात घट झाली. 10 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान पोहोचले आहे. कोकणातही परिस्थिती तिच आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
हेच नाही तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. यातच किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. राज्यातील हवामानात मागील काही तासांपासून बदल जाणवत आहे.