मुंबईपाठोपाठ ‘या’ शहरात टेस्लाचं दुसरं शोरुम सुरू, कारची किंमत काय?

टेस्ला या कंपनीने आता संपूर्ण भारतात या कारचं ऑनलाइन बुकिंग सुरू केलं आहे. यात प्राधान्यक्रमानुसार मुंबई, दिल्ली, गुरुग्राम आणि पुण्यातील ग्राहकांना प्रथम डिलिव्हरी दिली जाईल.

| Updated on: Aug 05, 2025 | 3:20 PM
1 / 5
अमेरिकन इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाने अधिकृतपणे भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आहे. 15 जुलै रोजी या जगविख्यात कंपनीने मुंबईत आपला पहिला शोरुम सुरू केला. आता टेस्ला देशाची राजधानी दिल्लीत आपला दुसरा शोरुम उघडणार आहे.

2 / 5
हे नवीन शोरुम येत्या 11 ऑगस्ट रोजी दिल्ली-गुरुग्राम सीमेवर असलेल्या एरोसिटीमधील वर्ल्डमार्क 3 इथं सुरू होणार आहे. अलीकडेच या नवीन टेस्ला शोरुमचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

3 / 5
मुंबईप्रमाणेच या शोरुममध्येही ग्राहकांसाठी गाड्यांचं प्रदर्शनदेखील असेल. टेस्लाने नुकतंच मुंबईत त्यांचं सुपरचार्जिंग स्टेशन लाँच केलं. जिथे 250 किलोवॅट तासाचा डीसी फास्ट चार्जर आणि 11 किलोवॅट तासाचा डेस्टिनेशन चार्जर उपलब्ध आहे.

4 / 5
250 kW चा सुपरचार्जर 24 रुपये प्रति kWh, तर डेस्टिनेशन चार्जर 14 रुपये प्रति kWh दराने चार्जिंगची सुविधा प्रदान करणार आहे. गेल्या महिन्यात टेस्लाने भारतात त्यांची पहिली कार टेस्ला मॉडेल Y ला लाँच केलं होतं. याची किंमत 59.89 लाख रुपयांपासून (एक्स -शोरुम, मुंबई) सुरु होते. जास्त आयात शुल्कामुळे या कारची किंमत अधिक आहे.

5 / 5
ही कार दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह येते. त्यात 60 kWh आणि एक मोठा 75 kWh बॅटरी पॅक यांचा समावेश आहे. 60 kWh बॅटरी 500 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देते आणि लांब पल्ल्याच्या व्हर्जनमध्ये 620 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज मिळते.