एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप करत थलपती विजय यांच्या पत्नीने कोर्टात मांडले 5 मोठे मुद्दे

थलपती विजय यांची पत्नी संगीता सोरनलिंगमने फेब्रुवारी महिन्यात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जात तिने विजय यांच्यावर पाच मोठे आरोप केले आहेत. हे आरोप कोणते, ते जाणून घ्या..

| Updated on: May 07, 2026 | 12:16 PM
1 / 7
थलपती विजय हे सध्या अभिनेत्री त्रिशा कृष्णनसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहेत. तर दुसरीकडे त्यांची पत्नी संगीता सोरनलिंगमने 27 वर्षांच्या संसारानंतर घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. या अर्जात तिने विजय यांच्यावर बरेच आरोप केले आहेत. हे आरोप कोणते, ते जाणून घेऊयात..

थलपती विजय हे सध्या अभिनेत्री त्रिशा कृष्णनसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहेत. तर दुसरीकडे त्यांची पत्नी संगीता सोरनलिंगमने 27 वर्षांच्या संसारानंतर घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. या अर्जात तिने विजय यांच्यावर बरेच आरोप केले आहेत. हे आरोप कोणते, ते जाणून घेऊयात..

2 / 7

संगीताने आरोप केला की 51 वर्षीय विजय यांचं एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध आहेत. याचिकेत दावा करण्यात आला आहे की, संगीताला 2021 मध्ये समजलं होतं की विजय एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंधांमध्ये गुंतला आहे.

3 / 7

संगीताने तिच्या याचिकेत असंही म्हटलंय की विजय यांनी तिला विवाहबाह्य संबंध संपवण्याचं वचन दिलं होतं, परंतु या आश्वासनानंतरही त्यांनी कोणताही पश्चात्ताप न दाखवता ते संबंध सुरुच ठेवलं.

4 / 7

विजय यांनी मला फक्त त्यांच्या सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यातूनच वगळलं नाही तर त्या कथित अभिनेत्रीसोबत परदेशात प्रवास करणं आणि सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहणं सुरूच ठेवलं, अशा शब्दांत संगीताने तिची व्यथा मांडली. तिने पुढे असंही म्हटलंय की, ती अभिनेत्री दोघांच्या प्रवासाचे फोटो सोशल मीडियावर वारंवार पोस्ट करत असे. मात्र विजय यांनी त्या पोस्ट नाकारल्या नाहीत किंवा त्यावर आक्षेपही घेतला नाही. अशा सोशल मीडिया पोस्टमुळे मला आणि माझ्या मुलांना वारंवार अपमान सहन करावा लागल्याचं संगीताने म्हटलं होतं.

5 / 7

न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत संगीताने असंही म्हटलंय की, विजय यांनी तिला पूर्वी मिळणाऱ्या सुविधाही काढून घेतल्या आहेत. इतकंच नाही तर तिच्या मुक्त संचारावरही निर्बंध घातले आहेत आणि आर्थिक बंधनंही लादली आहेत.

6 / 7

2024 पासून विजय यांचं सततचं व्यभिचारी वर्तन (विवाहित व्यक्तीने आपल्या जोडीदाराव्यतिरिक्त इतर कोणाशी स्वेच्छेने संबंध ठेवणं) आणि वारंवार होणारे सोशल मीडियावरील वाद यामुळे तीव्र मानसिक त्रास झाल्याचं संगीताने याचिकेत नमूद केलं. तिने न्यायालयाला स्पष्टपणे सांगितलं की, त्यांचं लग्न आता खऱ्या अर्थाने तुटलं आहे आणि ते फक्त कागदावरच अस्तित्वात आहे. हे नातं पुन्हा जोडणं अशक्य आहे आणि त्यातून तिला मानसिक यातना, अपमान, दु:ख यांशिवाय काहीही मिळालेलं नाही.

7 / 7

संगीता ही युकेमध्ये राहणाऱ्या एका श्रीलंकन तमिळ बिझनेसमनची मुलगी आहे. ती एकेकाळी विजय यांची खूप मोठी चाहती होती. युकेहून चेन्नईला आल्यानंतर संगीताने विजय यांची भेट घेऊन त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांची मैत्री झाली आणि 1999 मध्ये दोघांनी लग्न केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us